मुंबई - मुंबईत आजपासून हिवाळी अधिवेशन ( Maharashtra Winter Session 2021 ) सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी विरोधकांनी आंदोलन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) तब्येतीच्या कारणास्तव अधिवेशनाला हजर न राहिल्याने भाजपकडून अनेक आरोप केले जात होते. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी यावर प्रतिउत्तर ( Bhaskar Jadhav Criticized BJP ) दिले. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीमुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते हजर झाले नाहीत. मात्र अधिवेशन कालावधीत ते कधीही उपस्थित राहतील. देवेंद्र फडणवीस ( LOP Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री असताना तेही अनेकदा कामकाजाला उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे आताच मुख्यमंत्री का उपस्थित राहण्याचा प्रश्न विचारणे योग्य नाही, असे जाधव म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या कडे चार्ज?
प्रकृती स्थिर नसली याचा अर्थ दुसऱ्या कोणाकडे चार्ज देण्याचा प्रश्न येत नाही. भाजपकडून सध्या सुडाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळेच उठसुठ आरोप केले जात असल्याचे जाधव म्हणाले.
लवकरच गाळ उपसा कामाला सुरुवात होईल
चिपळूण तालुक्यात नदीतील गाळ उपसण्याच्या मुद्द्यावरून स्थानिकांनी धरणे आंदोलन केले आहे. राज्य विधिमंडळात याबाबत मी प्रश्न उपस्थित केला होता. सरकारने याची गंभीर दखल घेत, तात्काळ निधीची तरतूद केली आहे लवकरच चिपळूण मधील गाळ उपसा कामाला सुरुवात होईल असे जाधव यांनी सांगितले.