मुंबई - भंडारा जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर मदत करण्याच्या बहाण्याने सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या अत्याचाराची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी आयपीएस दर्जाच्या महिला पोलील अधिकाऱ्याची नेमणूक करावी. त्यांच्या नेतृत्वाखाली एसआटीमार्फत फास्ट ट्रॅकवर तपास करावा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले ( eknath shinde order fast track procedure bhandara rape case ) आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, भंडाऱ्यातील प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅकवर करुन आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे, तसेच यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही, असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पिडीत महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कोणत्याही प्रकारची हयगय यामध्ये होणार नाही, हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
गोंदिया जिल्ह्यात झाले पहिले अत्याचार - ही महिला गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. पतीने सोडून दिल्याने पीडिता तिच्या बहिणीच्या घरी राहायची. ३० जुलै रोजी तिचा बहिणीसोबत किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात तिने घर सोडले आणि माहेरी जाण्यासाठी निघाली. पायी जात असतांना एका नराधमाने मदतीच्या बहाण्याने आपल्या चारचाकी मध्ये बसविले आणि त्यानंतर तिच्यावर तब्बल दोन दिवस बलात्कार केला. ३१ जुलै रोजी पळसगाव येथे अत्याचार करून जंगलात सोडून दिले.
धाब्यावर पुन्हा दोन लोकांनी मदतीचा हात देत केले अत्याचार - जंगलात भटकत ही महिला १ ऑगस्ट रोजी भंडारा शहराजवळील कान्हालमोह येथील धर्मा ढाबा येथे आली. तिला एकटी पाहून एक व्यक्ती तिच्याजवळ आला. ‘घरी नेऊन सोडतो,’ असे म्हणाला. पण, महिलेला त्याच्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दुसऱ्या व्यक्तीने विश्वास दिल्यावर महिला सोबत जाण्यास तयार झाली. त्यानंतर पहिल्या व्यक्तीसोबत दुचाकीवर बसून महिला निघाली. पण, दोघांनीही तिच्यावर शेतात नेऊन अत्याचार केला. नंतर तिथेच सोडून दोघांनीही पळ काढला.
संपूर्ण रात्र विवस्त्र अवस्थेत पडली होती - अत्याचारानंतर रात्रभर पीडिता तशीच पडून होती. अत्याचारामुळं तिने शुद्ध गमावली होती. कन्हाडमोह येथे रात्रभर पीडिता वेदनेने विव्हळत होती. त्याचवेळी गावातील तरुणांचे तिच्याकडे लक्ष गेले. गावकरीही तिच्या मदतीसाठी धावले. पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. महिला विवस्त्र होती व वेदनेने कण्हत होती. पोटापासून पायापर्यंत रक्ताने शरीर माखले होते. आरोपींनी पीडितेच्या गुप्तांगावर धारदार शस्त्रांनी गंभीर जखमा केल्या आहेत. त्यामुळं पीडितेच्या गर्भाशयापर्यंत जखम झाली आहे. प्रचंड रक्तस्त्रावामुळं महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
हेही वाचा - Model Molestation Case : मुंबईत स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहता विरुद्ध मॉडेलचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल