ETV Bharat / city

Amol Mitkari Criticize Governor : मराठी माणसाचा अपमान खपवून घेणार नाही, राज्यपालांनी माफी मागावी - अमोल मिटकरी

"महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसली जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा." असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले ( Amol Mitkari Tweet ) आहे.

Amol Mitkari on Bhagat Singh Koshyari
अमोल मिटकरी
author img

By

Published : Jul 30, 2022, 11:04 AM IST

Updated : Jul 30, 2022, 11:37 AM IST

मुंबई - आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरींनी ( MLA Amol Mitkari ) राज्यपाल कोश्यारींवर टीकास्त्र सोडले ( Amol Mitkari criticize governor ) आहे. "महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसली जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा." असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे ( Amol Mitkari Tweet ) . राज्यपाल भरगतसिंह कोश्यारी ( Governor Bhargat Singh Koshyari ) यांनी मराठी माणसाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे सर्वच स्तरातून राज्यपालांवर टिका होत आहे.

  • महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा.@BSKoshyari pic.twitter.com/osCB25qC5a

    — आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यपाल नेमकं काय म्हणाले - आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या राज्यपालांनी या वेळेस थेट मुंबईबाबत एक मोठं विधान केले आहे. मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात. म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटले जाते. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असे थेट विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले . ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही राज्यपाल म्हणाले आहेत.

संदिप देशपांडे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे (controversial statement). महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही असे वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्यपालांवर टीका केली आहे. तर, राज्यपालांनी नको त्या गोष्ट्रीत नाक खुपसू नये, गुण्या गोविंदान नांदावे असा सल्ला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.

  • थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा
    आहे...
    105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता..
    मुख्यमंत्री शिंदे ...ऐकताय ना.
    की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे..
    स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा..
    दिल्ली पुढे किती झुकताय? pic.twitter.com/qhjQ3nGEwf

    — Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संजय राऊत यांची टीका - शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावरुन राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी मराठ्यांना जागे होण्याचे आवाहनही त्यांच्या वक्तव्यावरुन केले आहे. मराठी माणसाने जागे होऊन याचा तीव्र विरोध केला पाहिजे अशी अपेक्षा राऊत यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

  • आता तरी..
    ऊठ मराठ्या ऊठ..
    शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे..
    बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत..
    मराठ्या तुलाच उठावे लागेल.. pic.twitter.com/QYX4weHdQ2

राष्ट्रवादी आणि मनसेचे नेते भडकले - महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही असं वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्यपालांवर टीका केली आहे. तर, राज्यपालांनी नको त्या गोष्ट्रीत नाक खुपसू नये, गुण्या गोविंदान नांदावं असा सल्ला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.

राज्यपालांनी माफी मागावी-अमोल मिटकरी - महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसली जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय. महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.

मनसे नेते संदिप देशपांडेचा राज्यपालांना सल्ला - मुंबई महाराष्ट्राला मिळाली ती १०५ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे. मुंबईची प्रगती आणि महाराष्ट्राची प्रगती इथे राहणाऱ्या मराठी माणसामुळे झालेली आहे. जे बाहेरचे आले, त्यांना मुंबईने सामावून घेतले आहे याचा अर्थ त्यांच्यामुळे मुंबईची प्रगती झाली नाही. मुंबई महाराष्ट्रात आहे राज्यपालांनी पहिले समजून घ्यावं. मराठी माणसामुळेच मुंबई आहे आणि महाराष्ट्र आहे तिथे काय कोणी बाहेरचे आले आणि त्यांनी प्रगती त्याच्यामुळे आपली प्रगती झाली नाही त्यांची प्रगती झालेली आहे असे संदिप देशपांडे म्हणाले.

हेही वाचा - Koshyari controversial statement: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; म्हणाले मुंबईतून गुजराथी राजस्थानी गेले तर आर्थिक राजधानीची ओळख मिटेल

Last Updated : Jul 30, 2022, 11:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.