ETV Bharat / city

Mumbai Best Bus : बेस्टच्या 'या' निर्णयाचे केंद्र सरकारने केले स्वागत - बेस्टच्या मुंबईतील इलेक्ट्रिक हाऊस

मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाने बेस्टच्या ( Best Buses in mumbai ) ताफ्यात १०० टक्के इलेक्ट्रिक तसेच दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या आणण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या धोरणात्मक निर्णयाचे स्वागत केंद्र सरकारच्या अवजड उद्योग विभागाचे ( Central Heavy Industries Department ) सचिव अरुण गोयल यांनी केले आहे.

Mumbai Best Bus
मुंबई बेस्ट बस
author img

By

Published : Jan 5, 2022, 9:56 AM IST

मुंबई : भारत सरकारच्या अवजड उद्योग विभागाचे सचिव अरुण गोयल ( Union Heavy Industries Secretary Arun Goyal ) यांनी बेस्टच्या मुंबईतील इलेक्ट्रिक हाऊस ( BEST's Electric House in Mumbai ) येथील मुख्यालयात आढावा घेतला. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि सोलापूर यासारख्या शहरांमध्ये 'फेम २' योजनेच्या ( FAME 2 Scheme ) अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली. बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रिक बसगाड्यांचे प्रवर्तन करण्यासाठी जी पावले उचलली आहेत. त्याचबरोबर बसगाड्यांचा १०० टक्के ताफा इलेक्ट्रिक बसगाड्यांमध्ये बदलण्याचा जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे, त्याचे अरुण गोयल यांनी कौतुक केले.

बेस्टप्रमाणे डिजिटल व्हा -

बेस्टच्या बसेसची पाहणी करताना केंद्र सरकारच्या अवजड उद्योग विभागाचे अधिकारी

बेस्टने दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या ( Best's two-story air-conditioned electric bus ) आपल्या ताफ्यात दाखल करण्याचा जो निर्णय घेतला, त्याविषयी देखील त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच इतर महानगरांनी देखील या दुमजली बसगाड्या ताफ्यात सामील कराव्यात, असे मत व्यक्त केले. बेस्टने 'चलो' अँप ( Chalo App ) आणि डिजिटल तिकीटाबाबत जो पुढाकार घेतला आहे, त्याची नोंद घेताना बेस्ट सारखे देशातील इतर ठिकाणी देखील अशा प्रकारे डिजिटल तिकीट प्रणाली असावी. त्याचबरोबर डिजिटल कार्डचा वापर तिकीट पद्धतीसाठी करण्याविषयी सूचना गोयल यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिल्या. आढावा बैठक -यावेळी गोयल यांनी आढावा बैठक घेतली. या सभेमध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र ( BEST General Manager Lokesh Chandra ) , उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, अन्य सरकारी आणि महापालिका यांनी भारत सरकारच्या अन्य अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेतला. आढावा बैठकीनंतर भारत सरकारच्या अवजड उद्योग विभागाच्या सचिवांनी बेस्टच्या बॅकबे आगाराला भेट दिली. बसगाड्यांचे प्रवर्तन आणि इलेक्ट्रिक बसगाड्या चार्जिंग करण्याच्या पायाभूत सुविधांची माहिती घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.