ETV Bharat / city

BEST Diesel Bus On CNG Electric : बेस्टच्या डिझेवरील बस सीएनजीवर किंवा इलेक्ट्रिकवर चालवण्याचा विचार

author img

By

Published : Mar 20, 2022, 9:14 PM IST

बेस्ट परिवहनकडून ( BEST Road Transport Mumbai ) मुंबईकरांच्या सेवेत आता असलेल्या डिझेलवरील बसेसला लवकरच सीएनजी किंवा विजेवर चालतील अशा बनवण्याचा विचार करण्यात येत ( BEST Diesel Bus On CNG Electric ) आहे. त्यामुळे सद्यस्थितीत डिझेलवर चालत असलेल्या बसेस लवकरच सीएनजी अथवा विजेवर चालताना दिसणार आहेत.

बेस्ट डिझेल बस
बेस्ट डिझेल बस

मुंबई - मुंबईकरांना बेस्टकडून परिवहन ( BEST Road Transport Mumbai ) सेवा उपलब्ध करून दिली जाते. बेस्टच्या ताफ्यात डिझेलच्या बसेस होत्या. त्यानंतर काळानुरूप त्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक करण्यात आल्या. त्यानंतर बेस्टच्या ताफ्यातील डिझेलवरील बसेस भंगारात काढणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. ही चर्चा तथ्यहिन असून, डिझेलवरील बसेस भंगारात न काढता त्या बसगाड्या सीएनजीवर किंवा इलेक्ट्रिक वर चालवण्याचा विचार असल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली ( BEST Diesel Bus On CNG Electric ) आहे.

बेस्टच्या बस सीएनजीवर, इलेक्ट्रिकवर
डिझेलवर चालणाऱ्या बसगाड्यांचा प्रवर्तन खर्च प्रति किमी ४० रुपये असून, सीएनजीवर चालणाऱ्या बसगाड्यांचा प्रवर्तन खर्च प्रति किमी २६ रुपये आहे आणि इलेक्ट्रिकवर बसगाड्यांचा प्रवर्तन खर्च प्रति किमी ९ रुपये इतका आहे. मुंबई शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने तसेच बस प्रवर्तनातील तोटा कमी करून मुंबईकर जनतेला चांगली आणि किफायतशीर बससेवा देण्यासाठी बेस्ट उपक्रम कटिबद्ध आहे. अर्थसंकल्पात तरतूद केल्यानुसार या बसगाड्या सीएनजीवर किंवा इलेक्ट्रिकवर चालवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यासाठी किती खर्च येईल, तसेच या बसगाड्यांची किंमत याच्या आकडेवारीचा बेस्ट प्रशासन विचार करीत असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बस ताफा १० हजार होणार

सध्याच्या बसचे Life- cycle- cost analysis करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबतची संपूर्ण आकडेवारी समोर आल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. मुंबईकर जनतेला अधिक चांगली आणि सक्षम बस सेवा देण्याच्या उद्देशाने आणखी ४००० वातानुकूलित इलेक्ट्रिक बस गाड्या बेस्टच्या ताफ्यामध्ये समाविष्ट होणार आहेत. पुढील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये बेस्टचा एकूण बस ताफा १० हजार इतका होणार आहे. सध्या काही समाजमाध्यमांच्या ग्रूपमधे बेस्ट डिझेलच्या बसगाड्या भंगारात काढणारच आहे, अशा वस्तुस्थितीवर आधारित नसलेल्या चुकीच्या आणि तथ्यहीन बातम्या पसरविल्या जात आहेत असे बेस्ट उपक्रमाने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.