ETV Bharat / city

टाटा मोटर्सच्या 184 बसेस तपासणीसाठी परत पाठवा; बेस्ट सदस्यांची मागणी - वरळी आगार

३१ जुलै रोजी एका बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आग लागलेली बस 2 वर्षे जुनी होती. त्यामुळे बेस्ट कमिटी सदस्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत, टाटा मोटर्सकडून खरेदी केलेल्या बसबाबत चौकशी करण्याची मागणी केली.

best to resend 184 buses from tata motors for checking safety measures
author img

By

Published : Aug 3, 2019, 8:13 AM IST

मुंबई - माटुंगा येथे 31 जुलैच्या सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास बसला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती बेस्ट समितीत सादर करण्यात आलेल्या अहवालात देण्यात आली. आग लागलेली बस 2 वर्षे जुनी होती. त्यामुळे बेस्ट कमिटी सदस्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत, टाटा मोटर्सकडून खरेदी केलेल्या बसबाबत चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर प्रशासनाने टाटा मोटर्सच्या १८४ बस तपासणीसाठी परत पाठवाव्यात, अशी मागणी बेस्ट सदस्यांनी केली आहे.

माटुंगामध्ये पेटलेल्या बसमधील अग्निशामक यंत्र घटनेवेळी काम करत नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली. सुदैवाने या बसमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका झाली. त्यानंतर, सदर बस दादर कार्यशाळेत आणण्यात आली. या आगीत बसचालक केबिन व 6 आसने जळाली आहेत. या घटनेत तातू फर्नांडिस या बसचालकाने दाखवलेल्या प्रसंगवधनाबद्दल बेस्ट समितीने त्यांचे कौतुक केले.

त्यामुळे, भविष्यात आगीच्या घटना टाळाव्यात यासाठी सुरक्षितेच्या दृष्टीने टाटा मोटर्स कडून खरेदी करण्यात आलेल्या सर्व 184 बसेस तपासणीसाठी पाठवण्याची मागणी बेस्ट सदस्यांकडून करण्यात आली.

Intro:मुंबई - वैशाली नगर मुलुंड ते वरळी आगारापर्यंतच्या मार्गावर मार्गक्रमण करणाऱ्या 27 नंबरच्या बसला 31 जुलै रोजी महेश्वरी उद्यान माटुंगा येथे सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सदर बसला आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती आज बेस्ट समितीत सादर करण्यात आलेल्या अहवालात देण्यात आली.Body:आग लागलेली बस 2 वर्षे जुनी होती. त्यामुळे बेस्ट कमिटी सदस्यांनी प्रवाशांच्या सुरक्षितेचा मुद्दा उपस्थित करत टाटा मोटर्सकडून खरेदी केलेल्या बसबाबत चौकशी करण्याची मागणी केली.
आगीच्या घटनेवेळी अग्निशामक यंत्र काम करत नव्हते त्यामुळे त्याचा वापर आग विझवण्यासाठी करण्यात आला नाही.
त्यामुळे भविष्यात आगीच्या घटना टाळाव्यात यासाठी सुरक्षितेच्या दृष्टीने टाटा मोटर्स कडून खरेदी करण्यात आलेल्या सर्व 184 बसेस तपासणीसाठी पाठवण्याची मागणी बेस्ट सदस्यांकडून करण्यात आली.Conclusion:सदर बसला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली. सुदैवाने या बसमध्ये असलेले 10 प्रवाशांची सुखरूप सुटका झाली. त्यानंतर सदर बस दादर कार्यशाळेत आणण्यात आली. या आगीत बसचालक केबिन व 6 आसने जळाली आहेत. यात तातू फर्नांडिस या बसचालकाने दाखवलेल्या प्रसंगवधनाबद्दल बेस्ट समितीत फर्नांडिस यांचे कौतुक करण्यात आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.