ETV Bharat / city

Eco Friendly BEST Bus Stop : मुंबईतील बेस्टचे बसथांबे होणार पर्यावरणपूरक.. प्रवाशांची होणार सोय - मुंबई बेस्ट बस थांबे

मुंबईतील बेस्ट बसचे बसथांबे आता पर्यावरणपूरक होणार ( Eco Friendly BEST Bus Stop ) आहेत. बेस्टच्या बसथांब्यांना ( BEST Bus Stops Mumbai ) प्रशासनाकडून नवा लूक देण्यात येत असून, यामुळे बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार ( BEST Bus Passengers Mumbai ) आहे.

Eco Friendly BEST Bus Stop
मुंबईतील बेस्टचे बसथांबे होणार पर्यावरणपूरक
author img

By

Published : May 10, 2022, 7:59 AM IST

मुंबई - मुंबईकरांची लाईफलाईन असलेला बेस्ट उपक्रम चलो ऍपच्या माध्यमाने डिजिटल झाला आहे. त्यानंतर आता बेस्टच्या प्रवाशांना ( BEST Bus Passengers Mumbai ) उन्हातान्हात बसची वाट पाहताना होणारा त्रास कमी करण्यासाठी मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनाकडून बस थांब्याना ( BEST Bus Stops Mumbai ) पर्यावरणपूरक असा नवा लूक दिला जात ( Eco Friendly BEST Bus Stop ) आहे. यामुळे बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार असल्याचा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यावर भर - बेस्ट बसमधून सुमारे 30 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. प्रवाशांना बस थांब्यावर बसची वाट पाहावी लागते. बेस्टचे बहुतेक थांबे हे एका खांबाचे किंवा लोखंडी होते. यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात उन्हाचे चटके खावे लागत होते. बस थांबे लोखंडी असल्याने उन्हाने तापल्याने थांब्यामधील आसनावर प्रवाशांना बसताही येत नव्हते. बेस्टने प्रवाशांच्या सोयीसाठी एसी बसेस आणल्या आहेत. बस कधी येणार याची माहिती प्रवाशांना मिळावी, प्रवाशांना तिकीट पास मिळावे यासाठी चलो ऍप सुरू केले आहे. यामुळे प्रवाशांना काही दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील बेस्टचे बसथांबे होणार पर्यावरणपूरक

प्रवाशांना चांगली सुविधा - बेस्टच्या प्रवाशांना आणखी दिलासा देता यावा यासाठी महापालिका व बेस्टने सुटसुटीत आसन व्यववस्था, आकर्षक रचना, पारदर्शक काचा तसेच बस थांब्यावर हिरवळ निर्माण केले करून पर्यावरण पूरक बस थांबे उभारण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व पश्चिम उपनगरातील 105 तर दुसऱ्या टप्प्यात 100 अशा एकूण 205 बस थांब्याना नवा लूक दिला जात आहे. यासाठी 17 कोटी 50 लाख रुपये खर्च केले जात आहेत. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा विकास निधीमधून या बस थांब्याचे काम केले जात आहे.

या बस थांब्याना नवा लूक - मुंबईत मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. ते बसचा वापरही मोठ्या प्रमाणात करतात. या प्रवाशांना व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बस थांब्याना नवा लूक दिला जात आहे. दक्षिण मुंबईत पर्यटकांची संख्या जास्त असलेल्या रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई विद्यापीठ, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथील पदपथांचे सुशोभीकरण करताना बेस्टच्या थांब्याना नवा लूक देण्यात आला आहे.

येथील बस थांबे बदलणार - पहिल्या टप्प्यात ओशिवरा येथे 15, गोवंडी 12, देवनार 11 तर गोरेगाव येथील 10 बस थांब्याना नवा लूक दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, सांताक्रूझ, वांद्रे, गोराई, मागाठाणे, मालाड, मालवणी येथील बस थांबेही बदलले जाणार आहेत.

असे असणार बस थांबे - बेस्टचे सुरुवातीला लाल रंगाने रंगवलेले बस थांबे होते. त्यानंतर त्यात बदल करून बस क्रमांकाचे खुले थांबे, लोखंडी आणि स्टीलचे बस थांबे असा थांब्याचा लूक होता. आता त्यात बदल करून सुटसुटीत आसन व्यवस्था, आकर्षक रचना, पारदर्शक काचा, थांब्याच्या टपावर हिरवळ निर्माण करून प्रवाशांना थंडावा मिळेल याची काळजी घेतली जात आहे, अशी माहिती पालिकेच्या नियोजन विभागाने दिली आहे.

बेस्टचे डिजिटलायझेशन - प्रवाशांना आणखी चांगली सुविधा देण्यासाठी प्रवाशांना पास आणि तिकीट देण्यासाठी बेस्टने 'चलो ऍप आणि स्मार्ट कार्ड काढले आहे. जानेवारीमध्ये या ऍप आणि कार्डचे लोकार्पण पर्यावरण व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 62 हजार प्रवाशांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. सध्या प्रवास करणाऱ्या 30 लाख प्रवाशांपैकी बहुसंख्य प्रवाशांनी चलो ऍपचे स्मार्ट कार्ड खरेदी केले आहे. नुकतेच बेस्टने 'वन नेशन वन कार्ड' (कॉमन मोबिलिटी कार्ड) प्रवाशांच्या सोयीसाठी आणले आहे. यामुळे प्रवाशांना एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो, मोनो ने प्रवास करता येणार आहे अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

प्रवासी संख्या, महसुलात वाढ - कोरोना काळात बेस्टने 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करत होते. 1 एप्रिल 2021 रोजी प्रवासी संख्या 23 लाख 40 हजार 968 होती. त्यावेळी रोजचे उत्पन्न 1 कोटी 78 लाख 45 हजार 754 इतके होते. एप्रिल 2022 ला प्रवासी संख्या 29 लाख 63 हजार 754 वर पोहचली असून रोजचा महसूल 2 कोटी 83 लाख 5 हजार 513 वर पोहचला आहे. गेल्या वर्षभरात साडेसहा लाख प्रवासी आणि एक कोटी चार लाख रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बेस्टची प्रवासी संख्या सुमारे 30 लाख असून 3 कोटी रोजचा महसुल आहे अशी माहिती महाव्यवस्थापकांनी दिली.

हेही वाचा : BEST : डिजिटल सेवा अन् अॅपचा बेस्टला 'असा' होतोय फायदा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.