मुंबई - दादर टीटी येथे आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास बेस्ट बसने डंपरला धडक दिली. या धडकेत बसमधील ड्रायव्हर, कंडक्टर, प्रवासी असे एकूण आठ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ जण गंभीर जखमी असल्याची माहिती सायन रुग्णालयाने दिल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
हेही वाचा - Pune : नवले पुलाजवळ सलग तिसऱ्या दिवशी अपघात, 2 महिला जखमी
आठ जण जखमी
बेस्ट उपक्रमाची बस मार्ग क्रमांक २२ ही मरोळ मोरोशी ते पायधुनी या मार्गावर चालते. आज या मार्गावरील बस पहाटे सव्वा सातच्या सुमारास दादर टीटी येथे आली असता बेस्ट बस चालकाने डम्परला मागून येऊन धडक दिली. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या धडकेमुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची माहिती
या बसमधून प्रवास करणारे प्रवासी आणि कंडक्टर, ड्रायव्हर या अपघात जखमी झाले आहेत. जखमी ८ जणांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी कंडक्टर, ड्रायव्हर तसेच इतर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर ३ रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सायन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर यांनी दिल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
हेही वाचा - Live CCTV : पोलीस अधिकाऱ्याच्या कारने 2 मुलींना चिरडले, एकीचा मृत्यू तर दुसरी गंभीर
गंभीर जखमींची नावे
- १) राजेंद्र, ड्रायव्हर, वय ५३ वर्ष
- २) काशीराम धुरी, कंडक्टर, ५७ वर्ष
- ३) ताहीर हुसेन, प्रवासी, ५२ वर्ष
- ४) रुपाली गायकवाड, प्रवासी, ३६ वर्ष
- ५) सुलतान, प्रवासी, ५० वर्ष
प्रकृती स्थिर असलेल्या प्रवाशांची नावे
- १) मन्सूर अली, प्रवासी, ५२ वर्ष
- २) श्रावणी म्हस्के, प्रवासी, १६ वर्ष
- ३) वैदेही बामणे, प्रवासी, १७ वर्ष