ETV Bharat / city

युकेमध्ये कोरोना रुग्णांत वाढ; आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर बंदी घालण्याची बाळासाहेब थोरातांची मागणी - suspend air travel to/from UK

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आला असून त्याचा प्रसार वेगाने होत आहे. यातच महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Dec 21, 2020, 1:30 PM IST

मुंबई - जगभरामध्ये कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आला असून त्याचा प्रसार वेगाने होत आहे. यातच महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात यांचे टि्वट

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची वाढ होत असल्याने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर बंदी घालावी. तसेच येणाऱ्या प्रवाशांना आयसोलेट करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी टि्वटद्वारे केली आहे. एका वृत्तपत्रातील बातमीचा हवाला देत, विमान वाहतुकीवर बंदी घालण्याची त्यांनी मागणी केली.

अनेक देशांच्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. ब्रिटनच्या काही भागांमध्ये पुन्हा 30 डिसेंबरपर्यंत लॉकडाउन घोषीत केला आहे. ब्रिटनमधील कोरोनाच्या प्रसारामुळे जगभरातील देशाची चिंता वाढली आहे. त्यामुळे यूरोपीय यूनियनच्या काही देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या फ्लाइटवर बंदी आणली आहे. फ्रान्स, जर्मनी, ईटली आदी देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या फ्लाइटवर बंदी लावली आहे.

कोरोना रुग्ण संख्या -

देशात कोरोना रुग्णसंख्या 1 कोटी 55 हजार 560 वर पोहचली आहे. यात 96 लाख 6 हजार 111 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3 लाख 3 हजार 639 जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 1 लाख 45 हजार 810 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासामध्ये 24 हजार 337 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 333 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - येत्या दोन दिवसांमध्ये तोमर घेणार आंदोलक शेतकऱ्यांची भेट - अमित शाह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.