मुंबई - 14 एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. जयंती निमित्ताने बाबासाहेबांचे लाखो अनुयायी मुंबईतील दादर चैत्यभूमीवर दर्शनासाठी येत असतात. मात्र, हे सर्व लोक चैत्यभूमी आधी एका ठिकाणाला भेट देतात आणि ते ठिकाण म्हणजे बाबासाहेब ज्या घरी राहत ( Rajgruha Babasaheb Ambedkar House in Mumbai ) होते ते घर 'राजगृह'. हे ठिकाण भारतीयांसाठी, विशेषतः बाबासाहेबांच्या चाहत्या वर्गासाठी पवित्र स्थान आहे. बाबासाहेब राजगृहात 15-20 वर्षे वास्तव्य होते. 6 डिसेंबर रोजी (महापरिनिर्वाण दिन) शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीपूर्वी ( Chaityabhoomi at Shivaji Park ) लाखो लोक या घराला भेट देतात. आंबेडकरांनी राजगृहात त्यांच्या काळात ५०,००० हून अधिक पुस्तके गोळा केली. ज्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या वेळी हे जगातील सर्वात मोठे खासगी ग्रंथालय बनले.
पुस्तकांसाठी जागा अपुरी : आंबेडकरांचे कायदेशीर कामांसाठीचे कार्यालय परळच्या दामोदर हॉलजवळ होते. त्यांचे घर त्यांच्या वाढत्या पुस्तक संग्रहाला सामावून घेऊ शकले नाही, म्हणून त्यांनी स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी नवीन घर बांधण्याचा निर्णय घेतला. आंबेडकरांनी आपल्या नवीन घरात वाचनालय बांधण्याची योजना आखली. नवीन रचनेत राजगृहाच्या तळमजल्यावर तीन खोल्यांचे दोन ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. त्याचे कुटुंब त्या दोन ब्लॉकमध्ये राहत होते. शाही घराच्या पहिल्या मजल्यावर त्यांनी आपली ग्रंथालय आणि कार्यालयाची व्यवस्था केली होती.
सध्याची परिस्थिती : सध्या बाबासाहेबांच्या घराला एक संग्रहालय बनवण्यात आल आहे. येथे बाबासाहेबांची सर्व भांडी, त्यांचा चष्मा, काठी आदी वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. एक पलंग सुद्धा आहे. या पलंगाला एक अनन्यसाधारण महत्त्व असून एक भावनिक किनार देखील आहे. कारण, याच पलंगावर बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला होता. या खोलीच्या बाहेरच एका खोलीत एका काचेच्या बंद पेटीत बाबासाहेबांचा अस्थिकलश देखील ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या जयंती दिवशी व सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या दिवशी येथे लाखो बाबासाहेबांचे अनुयायी येऊन त्यांच्या अस्थींचे दर्शन घेत असतात. विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या घरात आज देखील त्यांचे वंशज राहतात. बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर तसेच पणतू सुजात आंबेडकर हे आज देखील या घरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे हे फक्त घर नसून अनेक अनुयायांसाठी एक श्रद्धास्थान असल्याची भावना बाबासाहेबांच्या नातूंनी मांडली आहे.