मुंबई - शहरात वाढते हवा प्रदूषण लक्षात घेता त्यात सुधारणा व्हावी यासाठी वातावरण या संस्थेमार्फत सोलरवालाबेस्ट हे अभियान सुरू करण्यात आले आहे. सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी याविषयी छत्रपती शीवाजी महाराज टर्मिनस येथे पटनाट्याद्वारे जागृती केली. या पथनाट्यातून बेस्ट बसेसचा जास्तीत जास्त प्रवास करा असा संदेश देण्यात आला आहे.
मुंबईत खासगी वाहनांचा मोठ्या प्रमाणात प्रवासासाठी वापर होतो. हा वापर कमी व्हावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाहतूक व्यावस्थेचा वापर वाढावा यासाठी पथनाट्यातून जागृती करण्यात आली. या वेळी विजेवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाहतूक व्यावस्था व्हावी आणि जनतेने याला उचलून धरावे, शाश्वत अश्या सौर उर्जेवर आधारित वेजेचा वापर मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यावस्थसाठी करायला हवा, असा आग्रह मुंबईच्या जनतेने करावा.आपल्या प्रभागाच्या प्रतिनिधींना या विषयाची दखल घेण्यास भाग पाडावे, असे मुद्दे पथनाट्यातुन मांडण्यात आले.
पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी च्या वापरामुळे हवाप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे उर्जेचे स्त्रोत शाश्वत नसून ते आज ना उध्या संपणार आहेत. काळाची गरज म्हणून जनतेने आता सौरऊर्जेचा आग्रह धरला पाहिजे. सौरऊर्जेवर आधारित बेस्ट सेवा सुरू करण्याची मागणी जनतेने उचलून धरायला हवी या कडे लोकांचे लक्ष्य केंद्रित करण्याचा प्रयत्न केला गेला. या जनजागृती अभियानाद्वारे जे लोक नियमितपणे पब्लिक ट्रानस्पोर्टचा उपयोग करत आहेत, त्याच्या प्रति कृतज्ञा व्यक्त करण्यासाठी आणि त्याचे आभार मानण्यासाठी लोकांना थक्युचे स्टिकर्स देऊण त्यांचे आभार मानले जात आहेत. जे नियमित सार्वजनिक वाहतूक व्यावस्थेचा वापर करत नाहीत त्यांनी ही नियमितपने त्याचा वापर करून हवाप्रदूषण रोखण्याच्या दिशेने पाऊले टाकावीत असे आवाहन ही या अभियानाद्वारे करण्यात आले.