मुंबई - गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नामकरण करावे, अशी शिवसेनेची मागणी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) शिवसेनेच्या औरंगाबादमधील सभेवेळी नामांतराची घोषणा करतील, अशी बोलले जात होते. आधी विकास, मग नामांतर असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरेंनी प्रस्ताव पुढे ढकलला. आता सरकारवर अस्थिर झाल्यानंतर आज कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मांडून संभाजीनगर असे नामांतर करण्याची मागणी केली आहे. उद्या हा प्रस्ताव मंजुरीसाठी येईल. त्यावर उद्याच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे परब यांनी सांगितले.
वांद्रे येथील सरकारी घरांचा प्रश्नही तडकाफडकी मार्गी - वांद्रे येथील सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित होता. हा प्रस्ताव उद्या कॅबिनेट मीटिंगमध्ये मंजुरीसाठी येईल. या प्रस्तावामुळे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागून त्यांना दिलासा मिळेल, असे मंत्री परब यांनी सांगितले. कॅबिनेटमध्ये कोणत्याही राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ चर्चा करायची तयारी दर्शवली आहे. आता निर्णय त्या आमदारांच्या हातात आहे, असेही मंत्री परब म्हणाले.