ETV Bharat / city

Antilia Blast Case : अँटिलिया स्फोटकं प्रकरणातील तपासात सचिन वाझे अडथळा निर्माण करत होते; एटीएसचा धक्कादायक खुलासा

अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगासमोर ( Chandiwal Commision ) अँटिलिया स्फोटकं प्रकरणात ( Antilia Blast Case ) एटीएसने दाखल केलेल्या अहवाल रेकॉर्डवर घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार चांदीवाल आयोगासमोर हा ( ATS Report On Antilia Blast Case ) अहवाल सादर करण्यात आला.

Chandiwal Commision Latest Update
Chandiwal Commision Latest Update
author img

By

Published : Feb 10, 2022, 4:58 AM IST

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगासमोर ( Chandiwal Commision ) अँटिलिया स्फोटकं प्रकरणात ( Antilia Blast Case ) एटीएसने दाखल केलेल्या अहवाल रेकॉर्डवर घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार चांदीवाल आयोगासमोर हा ( ATS Report On Antilia Blast Case ) अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये अँटिलिया समोर स्कॉर्पिओ सापडल्यानंतर बॉम्ब शोध आणि निकामी पथकाकडून या वाहनाची तपास करताना सचिन वाझे या तपासात अडथळा निर्माण करत असल्याचे धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

अहवालात काय लिहीलं आहे? -

उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ वर्षभर अगोदर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसच्या अहवालातून महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. यामुळे निलंबित पोलीस अधिकारी आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेंचा पाय आणखी खोलामध्ये गेला आहे. स्फोटकांनी भरलेली कार अंबानींच्या निवासस्थान बाहेर आढळून आल्याचे समजताच वाझेंनी काय केले आहे, याची धक्कादायक माहिती अहवालामध्ये मिळाली आहे.

अँटिलिया समोर स्कॉर्पिओ सापडली असताना बॉम्ब शोध करत असताना गाडीचा दरवाजा खोलताच त्यातून एक चिठ्ठी मिळाली. ज्यामध्ये अंबानी कुटुंबियांना धमकावणारा मजकूर लिहिण्यात आला होता. याबद्दल आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कळवले. तसेच लगेचच नागरिकांना गाडीपासून दूर होण्यास सांगितले. त्यानंतर त्यात जिलिटिनच्या काड्या मिळाले. यानंतर बॉम्ब शोधक पथकातील व्यक्ती तपास करत असतानाही वारंवार वाझे गाडीजवळ जाऊन स्वत:सह इतरांचा जीव धोक्‍यात टाकत होते. त्यामुळे आम्ही त्यांना असे करु नका असे बजावले.

महाराष्ट्र एटीएसच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा आम्हाला संबंधित वाहनापबद्दल माहिती समजली आणि आम्ही त्याचा तपास करत होतो, तेव्हा 3 वाजून 50 मिनिटांनी आम्ही तिथे पोहोचलो. ज्यानंतर 9 वाजेपर्यंत आम्ही तपासणी केली. पण आमच्या पोहोचण्याआधीच सचिन वाझे त्याठिकाणी पोहोचले होते. तसेच आमच्या तपासांत वारंवार हस्तक्षेप करत होते.

पुढे बोलताना संबधित अधिकारी म्हणाले गाडीचा दरवाजा खोलताच त्यातून एक चिठ्ठी मिळाली. ज्यामध्ये अंबानी कुटुंबियांना धमकावणारा मजकूर लिहिण्यात आला होता. आम्ही याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कळवलं. तसंच लगेचच नागरिकांना गाडीपासून दूर होण्यास सांगितलं. त्यानंतर त्यात जिलिटिनच्या काड्या मिळाल्याने आम्ही लगेचच आसपासच्या सर्वांना दूर होण्यास सांगितलं. बॉम्ब शोधक पथकातील व्यक्ती तपास करत असतानाही वारंवार वाझे गाडीजवळ जाऊन स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात टाकत होते. त्यामुळे आम्ही त्यांना असे करु नका असे बजावले.

संबधित अधिकाऱ्याने त्याच्या रिपोर्टमध्ये उल्लेख केला आहे. की या कारवाईदरम्यान आम्ही सर्वांना दूर उभे राहण्यास सांगितले. सर्वजण याच पालन करत होते, पण वाझे आमच्या कामात वारंवार हस्तक्षेप करत होते. हा तोच रिपोर्ट आहे. ज्याची कॉपी नुकतीच ATS ने चांदीवाल आयोगासमोर ठेवली. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवेदनानंतर हा रिपोर्ट समोर ठेवण्यात आला आहे. देशमुख यांच्या रिपोर्टनुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हेच मागील मास्टरमाइंड आहेत असं नमूद करण्यात आलं आहे. हा अहवाल एटीएसने चांदीवाल आयोगासमोर ठेवला आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवेदनानंतर हा रिपोर्ट समोर ठेवण्यात आला आहे.

काय घडलं 'त्या' दिवशी? -

25 फेब्रुवारी 2021 रोजी अँटिलियापासून 400 मीटर अंतरावर एक स्कॉर्पियो कार आढळून आली. या कारमध्ये स्फोटकं असल्याचं तपासातून पुढे आलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. याचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा हात असल्याचं तपासातून पुढे आलं. त्यानंतर वाझेंना अटक झाली.

हेही वाचा - मुंबई महानगरपालिकेत प्रशासक नेमणार तर, कलिना येथे उभारणार लता दीदींचे स्मारक - मंत्री नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.