ETV Bharat / city

राहुल गांधी यांच्या दौऱ्यावेळीही हे सरकार कलम 144 लावणार का..? - ओवैसी - कलम 144 लागू

काँग्रेसचे राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या मुंबई दौऱ्यावेळीही हे सरकार कलम 144 लावणार का, असा सवाल एआयएमआयएम ( AIMIM ) उपस्थित केला. पुढे म्हणाले, राहुल गांधी येतील तेव्हा ओमायक्रॉनची ( Omicron ) चर्चा होणार नाही. केवळ सत्तेची चर्चा होईल. आमच्या रॅलीवेळी मात्र ओमायक्रॉनची चर्चा होते व कलम 144 लागू होते, अशी टीका ओवेसी यांनी केली.

Asaduddin Owaisi
असदुद्दीन ओवैसी
author img

By

Published : Dec 12, 2021, 5:19 AM IST

Updated : Dec 12, 2021, 6:49 AM IST

मुंबई - एमआयएम ( AIMIM ) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी ( Asaduddin Owaisi ) यांनी राज्यातील मुस्लिमांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी चांदिवली येथे तिरंगा रॅली काढत सभेचे आयोजन केले होते. मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. यवरुन ओवैसी यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसचे राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या मुंबई दौऱ्यावेळीही हे ठाकरे सरकार कलम 144 लावणार का, असा सवाल उपस्थित केला. पुढे म्हणाले, राहुल गांधी येतील तेव्हा ओमायक्रॉनची ( Omicron ) चर्चा होणार नाही. केवळ सत्तेची चर्चा होईल. आमच्या रॅलीवेळी मात्र ओमायक्रॉनची चर्चा होते व कलम 144 लागू होते, अशी टीका ओवेसी यांनी केली.

राज्यात केवळ 4.9 टक्के मुस्लिम पदवीधर

मुस्लिमांनी राजकीय धर्मनिरपेक्षतेपासून सांभाळून रहावे. अनेक जण निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दे उचलतात. निवडून येतात आणि आपली राजकीय पोळी भाजतात. सध्या राज्यात केवळ 4.9 टक्के मुस्लीम पदवीधर आहेत. नोकरीमध्ये आरक्षण नाही, शिक्षणामध्ये आरक्षण नाही. यामुळे राज्यातील मुस्लिम शैक्षणीक व आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, असे ओवैसी यांनी सांगितले.

आपल्या मतांचा योग्य वापर करा

मुस्लिम आरक्षणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अनेक भाषणे दिली. पण, आरक्षण दिले नाही. तुम्ही कधीपर्यंत अशाप्रकारे स्वतःची फसवणूक करून घेणार आहात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ), काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी शिवसेना किती धर्मनिरपेक्ष आहे हे सांगावे, असे असदुद्दीन ओवैसी यावेळी म्हणाले. मुस्लिम मुलांनाही शिकायचे आहे. त्यांनाही आरक्षण द्या, असेही ओवैसी यांनी म्हणाले. तसेच मुस्लिमांनी यांच्यावर विश्वास ठेवू नये. आपल्या मतांचा त्यांनी योग्य वापर करावा, असे आवाहन यावेळी ओवैसी यांनी म्हटले.

हे ही वाचा - MIM Tiranga Rally : मी खासदार आहे की दहशतवादी; एमआयएचे इम्तियाज जलील यांचा सवाल

Last Updated : Dec 12, 2021, 6:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.