ETV Bharat / city

लोकल सर्वांसाठी खुली होताच स्टंटबाज पुन्हा सक्रिय - मुंबई लोकल रेल्वे बातमी

लोकल ट्रेन सुरू होताच मध्य रेल्वे मार्गावर स्टंटबाज हिरो पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. या स्टंटबाजांमुळे इतर प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

as-soon-as-local-was-open-to-all-stuntmen-active-again
लोकल सर्वांसाठी खुली होताच स्टंटबाज पुन्हा सक्रिय
author img

By

Published : Feb 7, 2021, 7:36 PM IST

मुंबई - सर्वसामान्यांसाठी उपनगरीय लोकल ट्रेन सुरू होताच मध्य रेल्वे मार्गावर स्टंटबाज हिरो पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. या स्टंटबाजांमुळे इतर प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. रविवारी सायन ते दादर दरम्यान सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास एक तरुण धावत्या लोकलमध्ये स्टंट करण्याचा व्हिडीओ 'ईटीव्ही भारत'च्या कॅमेरात कैद झाला आहे. आता या स्टंटबाज हिरोंमुळे रेल्वे पोलिसांची डोके दुःखी वाढली आहे.

स्टंटबाज पुन्हा सक्रिय

समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल -

लोकल ट्रेनच्या प्रवासात थरथराक स्टंटबाजीचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करण्याऱ्या स्टंटबाज हिरोना कोरोना काळात ब्रेक लागला होता. मात्र, आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असताना सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलसेवा गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे धावत्या लोकलमध्ये स्टंट करणारे स्टंटबाज सक्रिय झाले आहे. त्यामुळे आता रेल्वे पोलीस सुद्धा या स्टंटबाजांवर कारवाई करण्यासाठी सज्ज झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून धावत्या लोकलमध्ये स्टंट करण्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

500 पेक्षा जास्त स्टंटबाजांवर कारवाई -

कोरोनापूर्वी म्हणजे मार्च 2019 पासून ते फेब्रुवारी 2020 पर्यंत रेल्वे पोलिसांकडून या स्टंटबाजावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. ज्यामध्ये 500 पेक्षा जास्त स्टंटबाजांचा समावेश होता. तर त्यांच्याकडून एक लाख 96 हजार 50 रुपये दंड सुद्धा आकारण्यात आला होता.

स्टंटबाजांवर रेल्वे पोलिसांचे असणार लक्ष -

जितेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले की, आम्ही या स्टंटबाजांना रोखण्यासाठी रेल्वेमार्गावर आणि लोकल डब्यात रेल्वे पोलिसांची नियुक्त करणार आहोत. तसेच या स्टंटबाजावर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस सोशल मीडियावर अपलोड केलेल्या विव्हीडीओवर सुध्दा लक्ष ठेवणार आहे.

हेही वाचा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राणेंच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.