ETV Bharat / city

Cruise Drug Case : पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त - नवाब मलिक

क्रूझ ड्रग प्रकरण बनाव आहे. याबाबत जामीन मिळालेले तरुण एनसीबीच्या विरोधात सर्व पुराव्यांसहित न्यायालयात गेल्यास या प्रकरणातील सर्व सत्य समोर येईल, असे वक्तव्य मंत्री नवाब मलिक यांनी केले.

nawab malik
नवाब मलिक
author img

By

Published : Oct 28, 2021, 6:10 PM IST

Updated : Oct 28, 2021, 7:24 PM IST

मुंबई - कार्डिलीया क्रूझ ड्रग प्रकरणात आरोपी असलेल्या आर्यन खान, मुनमून धामेचा आणि अरबाज मर्चंट यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. क्रूझ ड्रग प्रकरण बनाव आहे. याबाबत जामीन मिळालेले तरुण एनसीबीच्या विरोधात सर्व पुराव्यांसहित न्यायालयात गेल्यास या प्रकरणातील सर्व सत्य समोर येईल, असे वक्तव्य मंत्री नवाब मलिक यांनी केले. आधीच या प्रकरणांमध्ये सत्र न्यायालयात जामीन मंजूर व्हायला हवा होता. मात्र, एनसीबीकडून सातत्याने वेगवेगळी विधान केली जात होती. त्यामुळेच जामीन मिळायला उशीर झाला असल्याचे मतही मलिक यांनी व्यक्त केले.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

हेही वाचा - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावी याला 8 दिवसांची पोलीस कोठडी

  • अटक करणारा अधिकारीच अटक होऊ नये यासाठी न्यायालयात -

क्रूझ ड्रग प्रकरणात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आरोपींना अटक केली होती. मात्र, हे सर्व प्रकरण बनाव असल्याचे आपण आधीपासूनच सांगत होतो. या सर्व प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलीस करत आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी ही चौकशी करू नये यासाठी समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. याआधी आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी समीर वानखेडे मुंबई पोलिसांकडे गेले होते. मात्र, आता मुंबई पोलिसांकडून त्यांना सुरक्षा हवी आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण बनावट असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला.

  • तिघांना जामीन मंजूर -

मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा या तिघांना जामीन दिला आहे. या सर्वांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला आहे. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी आता ‘मन्नतवर’ होणार हे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन उद्या(29 ऑक्टोबर) तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Aryan Khan Bail Granted : तिघांना जामीन; उद्या किंवा परवा तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता

Last Updated : Oct 28, 2021, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.