मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये गेल्या 25 दिवसांपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आर्थर रोड तुरंगात अटकेत होता. ऑर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली असून तो मन्नत कडे रवाना झाला आहे. दरम्यान, काल आर्यन खानची जामीनदार म्हणून अभिनेत्री जुही चावला सेशन कोर्टात पोचली होती. मात्र, कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने आर्यनला कालची रात्र तरुंगात काढावी लागली.
म्हणून आर्यनचा तुरुंगातील मुक्काम वाढला -
आर्यनच्या जामीनासाठी अभिनेत्री जुही चावला जामीनदार म्हणून सेशन कोर्टात शुक्रवारी संध्याकाळी जवळपास साडेचार वाजेच्या सुमारास दाखल झाली. यावेळी आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे देखील कोर्टात आले होते. त्यांनी कोर्टात न्यायाधीशांकडे जामीनाचे कागदपत्रे सादर केले. तसेच जुही चावला जामीनदार म्हणून कोर्टात हजर झाली. यावेळी कोर्टात जुहीचे आधारकार्ड आणि पासपोर्ट सादर करण्यात आले. जुहीने औपचारिकपणे आपला परिचय कोर्टात दिला. पण जुहीचा एक पासपोर्ट फोटो कमी पडल्याने जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास उशिर झाला. नियमानुसार जामीनासाठी जामीनदाराचे दोन फोटो जरुरीचे असतात. पण दोन फोटो नसल्याने या प्रक्रियेला उशिर झाला. यावेळी कोर्टाने वकिलांना फटकारले. जामीनाची सर्व प्रक्रिया माहिती असताना जामीनदारांना त्याबाबत आधी माहिती देणे अपेक्षित होते, असे न्यायाधीशांनी वकिलांना सुनावले. त्यानंतर जुहीचे आणखी एक पासपोर्ट साईज फोटो मागविण्यात आला. मात्र, वेळ झाल्याने आर्यनला कालची रात्र तुरुंगात काढावी लागली.
-
Mumbai | Jail officials opened the bail box outside Arthur Road Jail at about 5:30 am today to gather bail orders. A physical copy of Aryan Khan's bail release order was also kept inside, yesterday.
— ANI (@ANI) October 30, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Aryan will be released this morning, in connection with drugs-on-cruise-case. pic.twitter.com/Kb8JCjeAHf
">Mumbai | Jail officials opened the bail box outside Arthur Road Jail at about 5:30 am today to gather bail orders. A physical copy of Aryan Khan's bail release order was also kept inside, yesterday.
— ANI (@ANI) October 30, 2021
Aryan will be released this morning, in connection with drugs-on-cruise-case. pic.twitter.com/Kb8JCjeAHfMumbai | Jail officials opened the bail box outside Arthur Road Jail at about 5:30 am today to gather bail orders. A physical copy of Aryan Khan's bail release order was also kept inside, yesterday.
— ANI (@ANI) October 30, 2021
Aryan will be released this morning, in connection with drugs-on-cruise-case. pic.twitter.com/Kb8JCjeAHf
आर्यनच्या स्वागतासाठी 'मन्नत'वर रोषणाई -
आर्यन खानच्या स्वागतासाठी शाहरुख खानचा बंगला 'मन्नत' लायटिंगने सजवण्यात आला आहे. काल शाहरुख आर्यनला घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलच्या दिशेला रवाना होणार होता. शाहरुख येणार म्हणून त्याला आणि त्याच्या मुलाला पाहण्यासाठी चाहत्यांनी ऑर्थर रोड जेलबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आज गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ऑर्थर रोड जेलबाहेर तैनात करण्यात येणार आहे.
हेही वाचा - पोपटाचा धंदा माझा नाही.. नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही - अल्पसंख्यांक मंत्री