मुंबई - कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी ( Cordelia Cruise Drugs Party ) प्रकरणातील आरोपी आर्यन खानला एनसीबीने क्लीन चीट दिल्यानंतर आर्यन खानने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टामध्ये धाव ( Aryan Khan rushed court for passport ) घेतली आहे. एनसीबीने जप्त केलेले पासपोर्ट परत देण्यात यावे अशा आशयाची याचिका आर्यन खानने दाखल केली आहे. त्या याचिकेवरची सुनावणी ( hearing )13 जुलै रोजी होणार आहे.
आर्यन खानने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टाने एनसीबीला उत्तर सादर करण्याचे निर्देश विशेष न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी दिले आहे. वकील राहुल अग्रवाल यांच्यासह वकील अमित देसाई यांनी सादर केलेल्या याचिकेवर 13 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. 27 मे रोजी सादर केलेल्या आरोपपत्रात एनसीबीने आर्यन खानसह सहा आरोपींवरील आरोप वगळले. पुरेशा पुराव्याअभावी त्यांना सोडून देण्यात आले ( lack of evidence released ) होते.आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि क्रूझ पाहुणे मुनमुन धमेचा ( Moonmoon Dhamecha) यांना 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना महिन्याच्या अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आर्यनवर कुठलेही ड्रग्ज सापडले नाही. मर्चंट आणि धामेचा यांचा आरोपपत्रात समावेश आहे. तर, एफआयआरमध्ये 20 आरोपींची नावे आहेत. कथित अमली पदार्थ तस्कर अब्दुल कादर आणि नायजेरियन नागरिक चिनेदू इग्वे हे दोनच आरोपी तुरुंगात आहेत.
आर्यन सुटण्याची ही तीन महत्वाची कारणे -
1 सुरूवातीलाच आर्यनच्या ज्या मित्राकडे चरस सापडले होते. त्याच्या जबाबात स्पष्टपणे आले आहे की, ते अमली पदार्थ आर्यनसाठी नव्हते. एनसीबी सतर्क आहे, ड्रग्ज घेऊ नको, असे आर्यनने त्याला सांगितले होते. असे त्या मित्राच्या जबाबात आले होते.
2 आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅट बाबतही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्या चॅटमध्ये या केसचा संबंध नाही.
3 आर्यनने ड्रग्ज घेतल्याचा आरोप होता. पण त्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणीच करण्यात आली नाही.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आले होते. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यामुळे आर्यन खान हा 27 दिवस जेलमध्ये रहावे लागले होते. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांच म्हणणे आहे. या दोघांतील व्हाट्सअॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली होती. मुंबई विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळून लावला होता. मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानने जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर तीन दिवस कंटिन्यू सुरू असलेल्या युक्तिवादानंतर अखेर आर्यन खानला जामीन मंजूर झाला होता.