मुंबई - क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Party Case) केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) दिल्लीतील विशेष पथकाने शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचा नवी मुंबईतील RAF एनसीबी कार्यालयात जबाब नोंदला जात आहे. गेल्या सात तासांपासून एनसीबी विशेष पथकाकडून (NCB's special squad) जबाब नोंदने सुरू आहे. सायंकाळी 5 वाजता चौकशी सुरू झाली होती. आज 13 नोव्हेंबरला आर्यन खानचा वाढदिवस (Aryan Khan birthday) आहे. त्याच्या 24 व्या वाढदिवसाची सुरुवात ही एनसीबीच्या चौकशीतच झाली आहे.
दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी -
क्रुझ ड्रग प्रकरणात जामीन देताना आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांनी एनसीबी कार्यालयात आज (शुक्रवारी) हजेरी लावली. हजेरी लावताना प्रत्येक वेळी त्याला जामिनाचे कागदपत्र सादर करून एनसीबीच्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते.
आर्यनची पुन्हा चौकशी सुरू
मागील आठवड्यात एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावल्यानंतर आर्यनला एनसीबीच्या एसआयटीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून आर्यनने यायचे टाळले होते. आज एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावल्यानंतर तो एसआयटीसमोरही चौकशीसाठी हजर झाला. त्याची चौकशी सुरू आहे. बेलापूर येथील आरएएफ कॅम्पमध्ये त्याचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
२ ऑक्टोबरला एनसीबीने क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर समीर वानखेडेंच्या नेतृत्वात छापा मारला होता. यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळल्याचा एनसीबीचा दावा आहे. याच प्रकरणात त्यावेळी आर्यनसह ८ जणांना अटक करण्यात आली होती. पुढे तब्बल २७ दिवसानंतर आर्यन खानची ३० ऑक्टोबर रोजी आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली होती. उच्च न्यायालयाने आर्यन खानला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार त्याला प्रत्येक शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.
हेही वाचा - न्यायालयाने ज्ञानदेव वानखडे यांच्या याचिकेवरील निर्णय ठेवला राखून