मुंबई - ड्रग्ज केस प्रकरणी ( Aryan Khan Drug Case ) बॉलिवूडचा शहेनशहा शाहरुख खानचा ( Actor Shahrukh Khan ) मुलगा आर्यन खानला एनसीबीने क्लीनचीट दिली ( Aryan Khan Clean Chit By NCB ) आहे. मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात आर्यन खानसह अन्य सहा आरोपींनी क्लीनचीट देण्यात आली आहे. त्यानंतर आता समीर वानखेडेंनी केलेल्या कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करणार असल्याची माहिती, वकील अली काशीद खान देशमुख यांनी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
एनसीबीने सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या 6000 हजार पानी आरोपपत्रात सहा आरोंपीविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या ड्रग्ज केस प्रकरणातून त्यांचा निर्दोष सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणातील आरोपी मुनमुन धमेजा यांचे वकील अली काशीद खान देशमुख यांनी म्हटले की, समीर वानखेडे यांनी ज्या प्रमाणात 20 लोकांवर आरोप लावले होते. त्यांच्यातील सहा जणांपशी कोणतेही ड्रग्ज संबंधित पुरावे आढळले नाही. त्यामुळे समीर वानखेडेंनी केलेल्या कारवाई विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी क्रॉस एफआयआर याचिका दाखल करुन एनसीबीला जवाब विचारणार आहे.
एनसीबीने तपासावेळी म्हटलेले की, या सर्व प्रकरणात अनेक व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहे. ते आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कनेक्शनशी संबंधित आहे. मात्र, तेव्हा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे वक्तव्य आज दाखल करण्यात आलेल्या एनसीबी एसआयटीने साक्षर चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही पहिल्यापासूनच सांगत होतो की या सर्व प्रकरणात आरोपींना फसविण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात एसआयटीने दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात आणखी पुढे काय आहे. यानंतर तपासून पाहिल्यानंतर पुढील काय कायदेशीर कारवाई करायची यासंदर्भात आम्ही विचार करू, असेही अली काशीद खान देशमुख यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Aryan Khan Drug Case : पुराव्या अभावी तक्रार नाही; बादशाहचा मुलगा निर्दोष