मुंबई शिंदे आणि ठाकरे गटात (Dispute between Shinde Thackeray group) अनंत चतुर्दशी दिवशी गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर आता गोळीबारात (firing) झाले आहे. काल मध्यरात्रीपासून हा वाद चिघळला असून आता हा वाद दादर पोलीस ठाण्यात (dadar police station) पोहोचला आहे. शिंदे गटामार्फत शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर पाच शिवसैनिकांना अटक (Five ShivSainik arrested) करण्यात आली. मात्र, ठाकरे गटाकडून महेश सावंत (mahesh sawant) यांनी तक्रार दाखल असता, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप खासदार अरविंद सावंत (mp arvind sawant) यांनी केला आहे. गोळीबार करणारे शिंदे गटाचे आमदार आणि सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा. अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.
एफआयआर दाखल करा (demant to register fir) आता दादर पोलीस ठाण्याबाहेर उद्धव ठाकरे गटाचे माजी महापौर महादेव देवळे, माझी महापौर किशोरी पेडणेकर, अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत दाखल झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांचा गट देखील पोलीस ठाण्यात जमला आहे. उपस्थित शिवसैनिकांनी '50 खोके आमदार बोके' अशा घोषणा देखील दिल्या. त्याचप्रमाणे, खासदार अरविंद सावंत यांनी एफ आय आर दाखल झाल्याशिवाय हलणार नाही असा ठाम पवित्रा घेतला आहे.
शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना मारहाण (Beating Santosh Telwane) झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर दादरमध्ये तणाव निर्माण झाला. या घटनेत पोलिसांनी ५ शिवसैनिकांना अटक केली असून, २०-२५ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. प्रभादेवीत झालेल्या घटनेबाबत संतोष तेलवणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. त्यावरून हाणामारीचा प्रकार घडला आहे. याबाबत संतोष तेलवणे म्हणाले की, "मी इमारतीखाली उभे असताना ५० जण माझ्यासमोर आले आणि माझ्याशी वाद घातला. मी एकटा त्यांना पुरेसा होता. हात लावायचं तर ठार मारा, जिवंत ठेवला तर तुम्हाला एकएकाला घरातून उचलून मारेन. आम्ही पण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. पूर्वीची शिवसेना राहिला नाही. आधी १-२ जण मारायला जायचे आता एका शाखाप्रमुखाला मारायला ५० जण येतात. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जात आहोत." असं त्यांनी म्हटलं.