मुंबई -देशाच्या स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचे ( 75th anniversary of the countrys independence ) औचित्य साधत अखिल भारतीय क्रीडा भारतीने अभिनव पद्धतीने अभिवादन करण्याचे ( Akhil Bharatiya Krida Bharati ) नियोजन केले आहे. या नियोजनानुसार, देशाच्या सीमेवरील राष्ट्रीय महामार्गावरुन दुचाकीवरुन २२ मे रोजी एकाच दिवशी किमान १०० किलोमीटर प्रवास करत ( national highway at the border of the country ) साखळी तयार केली जाईल.
देशातील सर्व राज्यातील १५० स्थानांवरुन प्रत्येकी ७५ दुचाकीस्वारांचे १५० गट एकाच वेळेला आपल्या स्थानापासून दुसऱ्या गटाच्या प्रारंभ स्थानापर्यंत प्रवास करुन साखळी पद्धतीने एक अभिनव विक्रम करणार ( setting an innovative chain ) आहेत.
२० हजार दुचाकी चालक सहभागी होणार - क्रीडा भारतीने दिलेल्या माहितीनुसार, या अभियानात सुमारे २० हजार दुचाकीस्वार एकाचवेळी किमान १०० किमी इतका प्रवास करणार आहेत. कोकण प्रांतात खोपोली-पनवेल-ठाणे-चारोटी-तलासरी-वापी या स्थानापर्यंत प्रदक्षिणा असेल. या एकूण मार्गाचे तीन टप्प्यात विभाजन केले आहे. तसेच मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातून दोन उपयात्रा चेंबूरहून गेटवे ऑफ इंडिया ते ठाणे मार्गक्रमण करणार आहेत. याशिवाय विक्रमगड, पालघर, बोईसर, डहाणू या चार उपयात्रा डहाणू-चारोटी-वापी उपयात्रेत सामील होईल. या तीन प्रमुख मार्गाव्यतिरिक्त पणजी ते कुडाळ, कुडाळ ते रत्नागिरी, रत्नागिरी ते चिपळूण, चिपळूण ते माणगाव, माणगाव ते पनवेल या पाच उपमार्गावरही प्रदक्षिणा आयोजित केल्याचे आयोजकांनी सांगितले.
उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी - प्रत्येक गटामध्ये २५ दुचाकीस्वार आणि त्यांचे २५ सहकारी असे ५० जण असणार आहे. दुचाकीस्वाराला आपली स्वत:ची दुचाकी आणावी लागेल. प्रवासात चहापान व भोजन यासह येणारा अन्य खर्च क्रीडा भारतीतर्फे केला जाईल. पेट्रोलचा खर्च दुचाकीस्वार करतील. प्रत्येक दुचाकी स्वार आणि त्याचा सहकाऱ्यांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे क्रीडा भारतीने स्पष्ट केले.
हेही वाचा-Raj Thackeray : राज ठाकरेंची हिंदूंना साद.. म्हणाले, हनुमान चालीसा वाजवाच, आता नाही तर कधीच नाही