मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व इतर राज्यातील कामगारांकडून प्राप्त होणाऱ्या विविध तक्रारी संबंधात कार्यवाही व्हावी, याकरिता मुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालय व मुंबई शहर कार्यालयाकरिता नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
कोरोनाचा कामगार क्षेत्रावर परिणाम
सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना वाढीचे प्रमाण वाढत असून यामुळे याचा परिणाम विविध उद्योग क्षेत्र, व्यवसाय येथे पडताना दिसत आहे. कामगार क्षेत्रावरही याचा परिणाम होतो आहे. परिणामी कामगार, स्थलांतरित कामगार यांना वेळेवर पगार, आरोग्य सुविधा व इतर बाबीविषयी काही समस्या निर्माण झाल्या आहेत. मुंबईत अशा समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या कामगार विभागाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी राज्यातील व इतर राज्यातील स्थलांतरीत कामगारांकडून होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व संबंधीतांशी समन्वय साधून कार्यवाही करावयाची आहे.
तक्रारी येथे नोंदवा
सतिश तोटावार, सहायक कामगार आयुक्त, भ्रमणध्वनी क्र. 9960613756, ई-मेल adclkokandivision@gmail.com.
मंगेश झोले, सरकारी कामगार अधिकारी, भ्रमणध्वनी क्र. 8451846222,
प्रविण जाधव, सहायक कामगार आयुक्त, भ्रमणध्वनी क्र. 8329695218, ई-मेल dyclmumbaicity gmail.comConclusion: