नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आज लवंगी मिरचीच्या दरात ७०० रुपयांनी वाढ ( Cloves Increased by Rs 700 ) झाली. कोबीच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. पावसामुळे तरकारी भाजीपाल्याला फटका बसला आहे. मालाची आवक कमी असली तरी बाजारात भाज्यांचे दर ( Prices of Vegetables ) स्थिर पाहायला मिळाले. तरी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या मालाची काढणी करता येत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान होत आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ४५०० ते ६००० रुपये, भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ७५०० ते ९००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ५३०० ते ७००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे, ८००० ते १०,००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६५०० ते ८०००, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये, कैरी प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १५०० ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० ते ३६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे ३४०० ते ३८०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे, २००० ते २४०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ४००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये,
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० ते ३४०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २२०० ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १९०० ते २००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १३०० ते १६००रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ८५००ते १०००० रुपये, वालवड प्रति १०० किलोप्रमाणे ५००० ते ६००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० ते २२०० रुपये, वांगी गुलाबी प्रति १०० किलोप्रमाणे १९०० रुपये ते २२००, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २१०० ते २२०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० ते ४००० रुपये, मिरची लंवगी प्रति १०० किलोप्रमाणे ३७०० ते ४००० रुपये
पालेभाज्या : कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ११०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १४००, मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १४०० ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२००ते १४०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २२०० रुपये ते २४०० रुपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ९०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५०० ते ६०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
हेही वाचा : President election results : मुर्मू, सिन्हा यांच्यातून कोण होणार राष्ट्रपती? आज आहे निकाल