ETV Bharat / city

Sanjay Raut Allegation Kirit Somaiya : 'एक खुनी पुन्हा एकदा अलिबागच्या भूमीवर चाललाय,' राऊतांची सोमैयावर घणाघाती टीका - sanjay raut marathi news

किरीट सोमैया रश्मी ठाकरे यांचे बंगले जनतेसमोर आणण्यासाठी अलिबागला जात ( kirit Somaiya Alibag Tour ) आहे. यावर एक खुनी पुन्हा एकदा अलिबागच्या भूमीवर चालला आहे, अशी टीका राऊत यांनी सोमैयावर केली ( Sanjay Raut Allegation Kirit Somaiya ) आहे.

Sanjay Raut Allegation Kirit Somaiya
Sanjay Raut Allegation Kirit Somaiya
author img

By

Published : Feb 18, 2022, 1:19 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे अलिबाग मधील एकोणीस ( Rashmi Thackeray Alibag House ) बंगले जनतेसमोर आणण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमैया आज अलिबागला जाणार ( kirit Somaiya Alibag Tour ) आहे. यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी 'तो एक वेडसर माणूस आहे. त्याला जास्ती महत्व देऊ नका. एक खुनी पुन्हा एकदा अलिबागच्या त्याच भूमीवर चालला आहे,' अशी टीका राऊत यांनी केली ( Sanjay Raut Allegation Kirit Somaiya ) आहे.

सोमैया अन्वय नाईक यांना धमकी द्यायचे

प्रसारमाध्यमांना बोलताना संजय राऊत म्हणाले की, "अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली? यावर भाजपाचे लोक बोलत नाहीत. त्यांनी या विषयावर बोलले पाहिजे. मला माहिती मिळाली की सोमैयांनी अन्वय नाईक यांना स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलावून दोन वेळा धमकी दिली आहे. त्यानंतर अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली. भाजपाचे लोक अर्णब गोस्वामीला वाचवण्यासाठी एवढा आटापिटा का करतायत? एक खुनी पुन्हा एकदा अलिबागच्या त्याच भूमीवर चालला आहे," असे राऊत यांनी म्हटलं.

संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना

बाप बेटे लवकरच तुरुंगात जाणार

"मी आधीच सांगितले आहे हे दोघेही बाप बेटे लवकरच तुरुंगात जाणार आहेत. त्यांची वाटचाल देखील त्याच दिशेने सुरू आहे. किरीट सोमैया हा एक वेड लागलेला माणूस आहे. तुम्ही त्याला जास्ती महत्व देऊ नका," असेही राऊत यांनी सांगितले.

ते काय क्रांतिवीर आहेत का ?

"कोणाला कुठं जायचं तिकडे जाऊ दे, तुम्ही का त्यांच्या मागे मागे जात आहात? ते काय क्रांतिवीर आहेत का? ते काय नेल्सन मंडेला आहेत? सोमैया एक लफंगा आणि चोर आहे. सगळ्यात जास्त खंडणीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत," असे टिकास्त्र राऊत यांनी सोडले आहे.

हेही वाचा - Ahmedabad Bomb Blast : 2008 मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 38 दोषींना फाशीची शिक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.