मुंबई - तुम्ही आतापर्यंत नो हॉर्नच्या पाट्या वाचल्या असतील. सायलेंट झोनच्या पाट्या वाचल्या असतील. तसंच नो पार्किंगच्या सुद्धा पाट्या वाचल्या असतील. मात्र मुंबईच्या बोरिवली परिसरात आशा पाट्या लागल्या आहेत. ज्या वाचून भल्याभल्यांच्या भुवया उंचावतील. बोरिवलीच्या जॉगर्स पार्क येथे इथे लिहलंय नो किसिंग झोन. या जॉगर्स पार्कमध्ये अनेक प्रेमीयुगुल येत असतात. त्यांचे अश्लील चाळे पाहून इथल्या आसपासच्या सोसायटीतले लोक कंटाळले होते. त्यामुळे कंटाळलेल्या सोसायटीवाल्यांंनी रस्त्यावर लिहिले आहे नो किसिंग झोन.
मेसेज लिहिल्यानंतर प्रेमीयुगुलांची संख्या कमी -
हा बोरिवलीचा हाय प्रोफाइल परिसर आहे. याच हायप्रोफाईल जागेमध्ये एक गार्डन बनवले आहे. या गार्डनमध्ये रोज प्रेमीयुगुल येत असतात. आडोसा पाहून कुठेतरी बसत असतात. कुठल्यातरी कोपऱ्यात उभे राहातात आणि अश्लील चाळे करतात. यामुळे आसपास राहणाऱ्या इमारतीमधील महिला लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती रोज हे पाहून त्रस्त झाले होते.
प्रेमीयुगुलांना कंटाळून स्थानिकांनी लढवली शक्कल
वाढणारे हे प्रकार लक्षात घेता सोसायटीतल्या लोकांनी एक नामी शक्कल लढवली. या अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांना वेसण घालण्यासाठी त्यांनी सोसायटीच्या बाहेर असणाऱ्या रस्त्यावर लिहिलं की, नो किसिंग झोन. हा मेसेज लिहिल्यानंतर या भागामध्ये प्रेमीयुगुल कमी झालं आहे आणि जे अश्लील कृत्य चालायची ती बंद झाली आहेत.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान शिवसेना-भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले