ETV Bharat / city

एकनाथ खडसे अडचणीत ? अंजली दमानिया यांच्याकडून ईडीला कागदपत्रे सादर - Eknath Khadse land scam in Bhosari

तत्कालीन भाजप सरकारमध्ये महसूल मंत्री पदावर असलेल्या एकनाथ खडसे यांच्या पत्नी व जावयाकडून पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसी परिसरातील जमीन व्यवहार करण्यात आला होता. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले होते.

अंजली दमानिया यांच्याकडून ईडी अधिकाऱ्यांना कागदपत्रे सादर

author img

By

Published : Jan 5, 2021, 4:44 PM IST

मुंबई- पुण्यातील भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये जमीन व्यवहारासंदर्भात महसूल मंत्रिपद गमावलेले एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत सापडत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घोटाळ्या संदर्भातची महत्त्वाची कागदपत्रे ईडी कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांना दिली आहेत.

भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना ईडीकडून चौकशीचे समन्स पाठवण्यात आले. याप्रकरणी एकनाथ खडसे यांची चौकशी केली जात असताना या संदर्भातील मुख्य तक्रार असलेल्या सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या वकिलांकडे ईडीने काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्यानुसार दमानियांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना घोटाळ्यासंदर्भातील कागदपत्रे दिली आहेत. या प्रकरणांमध्ये अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासूनच एकनाथ खडसे यांच्या विरोधात गैरव्यवहारप्रकरणी आरोप केलेले आहेत.

हेही वाचा-ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी

काय आहे प्रकरण?

तत्कालीन भाजप सरकारमध्ये महसूल मंत्री पदावर असलेल्या एकनाथ खडसे यांच्या पत्नी व जावयाकडून पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसी परिसरातील जमीन व्यवहार करण्यात आला होता. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले होते. मात्र , हा व्यवहार पूर्णपणे खासगी जमिनीचा झालेला असून कायद्याच्या चौकटीत करण्यात आल्याचा दावा खडसे यांनी केला होता. या अगोदर या संदर्भात ती तपास यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीनचिट देण्यात होती. आपण कुठलीही चुकीची गोष्ट केली नसल्याचे एकनाथ खडसे हे वारंवार सांगत आले आहेत.

हेही वाचा-ईडीच्या नोटीसचा दुसरा अर्थ काढणे चुकीचे - प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आणि ईडी नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना एकनाथ खडसे यांनी तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेल असा विरोधकांना इशारा दिला होता. दरम्यान, ईडीकडून सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर ईडीचा ससेमिरा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी, खासदार प्रताप सरनाईक यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.