मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख शंभर कोटी कथित वसुली प्रकरणी ( Anil Deshmukh Money Laundering Case ) त्यांचे पीएस संजीव पालांडे आणि पीए कुंदन शिंदे यांची चौकशी सीबीआयने केली ( Cbi Reinvestigate Sanjiv Palande ) होती. आता पुन्हा सीबीआयने शिंदे, पालांडे आणि सचिन वाझे यांच्या चौकशीसाठी मुंबई सत्र न्यायलायत अर्ज दाखल केला ( Cbi Reinvestigate Sachin Waze ) होता. तो अर्ज मुंबई न्यायालयाने मंजुर केला आहे.
संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे यांची यापुर्वी सीबीआयने चौकशी केली होती. मात्र, अधिक चौकशीसाठी सीबीआयने मुंबई न्यायालयाच्या NIA न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाला न्यायालयाने मंजुरी देत सचिन वाझे याची 15 आणि 16 फेब्रुवारी तर, संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांची 16 आणि 17 फेब्रुवारी असे दोन दिवस चौकशी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ
सीबीआयने अनिल देशमुख प्रकरणी चौकशी सुरु केली असता, संतोष जगताप या मध्यस्थाला ठाण्यातून अटक केली होती. तसेच, याप्रकरणाचा चौकशी अहवाल लिक केल्याप्रकरणी अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि एका सीबीआय अधिकाऱ्याला अटक केली होती. ते दोन्ही आरोपी जामीनावर सध्या बाहेर आहेत. मात्र, या सर्व चौकशीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.