ETV Bharat / city

अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, प्रभू, पोतनीसांसह सुनील राऊत राज्यसभेसाठी पोलिंग एजंट - विधिमंडळातून राज्यसभेत उमेदवार

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई मुख्य पोलिंग एजंट म्हणून काम करणार आहेत. तर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर, शिवसेना प्रतोद सुनील प्रभू, आमदार विलास पोतनीस आणि सुनील राऊत हे चार जण पोलिंग एजंटच्या भूमिकेत असणार आहेत.

राज्यसभेसाठी पोलिंग एजंट
राज्यसभेसाठी पोलिंग एजंट
author img

By

Published : Jun 10, 2022, 6:30 AM IST

मुंबई - राज्यात तब्बल 24 वर्षांनी होत असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई मुख्य पोलिंग एजंट म्हणून काम करणार आहेत. तर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर, शिवसेना प्रतोद सुनील प्रभू, आमदार विलास पोतनीस आणि सुनील राऊत हे चार जण पोलिंग एजंटच्या भूमिकेत असणार आहेत. निवडणुकीत मत बाद होऊ नयेत, यासाठी शिवसेनेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. हॉटेल ट्रायडंट येथे शिवसेना आमदारांची आणि समर्थकांची बैठक पार पडली. बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधिमंडळातून राज्यसभेत उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार हे दोन उमेदवार रिंगणात असतील. भाजपने मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. धनंजय महाडिक सहाव्या तर भाजपच्या तिसऱ्या जागेसाठी निवडणूक लढणार आहेत. महा विकास आघाडीकडून त्यांच्या विरोधात संजय पवार यांचे कडवे आव्हान असणार आहे. या दोन्ही जागा इतर छोटे, अपक्ष आमदारांवर निवडून येणार आहेत. मात्र, अपक्ष कोणाच्या बाजूने कौल देणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

मतदान प्रक्रिया किचकट - प्रत्येक आमदाराला मतदानाला जाण्यापूर्वी निवडणूक अधिकाऱ्याकडून पेन दिला जातो. त्याच पेनचा वापर करत, पहिला, दुसरा आणि तिसऱ्या पसंतीच्या कर्माचा उल्लेख मतपत्रिकेवर करावा लागतो. त्या पेना व्यतिरिक्त कोणत्याही ó पेन-पेन्सिलचा त्यासाठी वापर करता येत नाही. आमदारांनी चुकून इतर पेन पेन्सिल वापरल्यास ती मतपत्रिका बाद ठरवली जाते. तसेच तेही चिन्ह किंवा नावाचा उल्लेख करायचा नसतो. मतपत्रिकेवर इतर कोठेही अंक किंवा चिन्ह काढल्यास मतपत्रिका बाद होते. मतपत्रिकात दिलेल्या नावाच्या पुढे मतदार आमदाराला केवळ पसंतीक्रम द्यावा लागतो. यामध्ये स्पष्ट संख्येत किंवा रोमन अंकात 1, 2, किंवा 3 असा पसंतीक्रम द्यायचा असतो. फक्त एकाच उमेदवाराला पहिला क्रमांकाचा पसंतीक्रम देता येतो.

नार्वेकर, प्रभू, राऊत, पोतनीस पोलिंग एजंट - मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी मतदारांनी मतदान करताना काय खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई मुख्य पोलिंग एजंटतर शिवसेना प्रतोद सुनील प्रभू आमदार सुनील राऊत आणि विलास पोतनीस पोलिंग एंजट म्हणून काम करणार आहेत. शिवसेना आमदारांची हॉटेल ट्रायडंट येते बैठक पार पडली. बैठकीला समर्थक 12 आमदार यांना प्रशिक्षण देण्यात आले शिवसेना नेते काचेचे पर्यावरण मध्ये आदित्य ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत आदी नेते मंडळी उपस्थित होते. तसेच शिवसेना आमदार आणि इतर छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार उपस्थित केला. विनोद अगरवाल, नरेंद्र बोंडे, विनोद निकोले, शंकरराव गडाख, राजेंद्र पाटील-यड्रावक, मंजुषा गावित, गीता जैन, आशिष जयस्वाल, बच्चू कडू, किशोर जोरगेवार, चंद्रकांत पाटील, राजकुमार पटेल या आमदारांचा बैठकीत समावेश होता.

हेही वाचा - Rajyasabha Election 2022 : राज्यसभेसाठी आज होणार मतदान; सहाव्या जागेसाठी अटीतटीची लढाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.