मुंबई - क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या व्हाट्सअप चॅट नंतर अभिनेत्री अनन्या पांडे हीचे नाव समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून अनन्या पांडेची चौकशी एनसीबीकडून सुरू आहे. आज यांची जप्त केलेले मोबाईल आणि लॅपटॉप फॉरेन्सिक लॅब तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी एनसीबी अधिकाऱ्यांकडून अनन्या पांडे यांच्या घरी जाऊन चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांकडून अनन्या पांडे चा एक लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त केले होते. ते आज फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान यांचा व्हाट्सअप चॅटिंग ड्रग्जचा उल्लेख असल्यामुळे अनन्या पांडे ची NCB अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर येत्या मंगळवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सध्या एनसीबी हायकोर्टात आणखी ठोस बाजू मांडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बुधवारी एनसीबीने कोर्टात दाखल केलेल्या आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये एका बॉलिवूडच्या नवोदित अभिनेत्रीचं नाव असल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर गुरुवारी ही अभिनेत्री कोण आहे, याचा खुलासा झाला. बॉलिवूडमधील नवोदित अभिनेत्री अनन्या पांडे हिच नाव आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आढळले. यात ड्रग्ज संबंधित बातचित केल्यामुळे अनन्याला एनसीबीने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहायला सांगितले. काल अनन्याची एनसीबीकडून २ तास चौकशी केल्यानंतर आजही तिची चौकशी सुरु आहे.
बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यनचा व्हाँट्सअप चॅट
आजच्या सुनावणीपूर्वी या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीच्या हाती आर्यन खानचे काही चॅट्स लागले आहेत. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानसोबत बॉलिवूडची एक नवखी अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. चॅट्समध्ये अभिनेत्रीसोबत आर्यन खानची अमंली पदार्थांबाबत चर्चा झाली होती. कोर्टात सुनावणी दरम्यान एनसीबीनं ज्या आरोपींचे चॅट्स सादर केले होते. त्यामध्ये आर्यन खानसह या अभिनेत्रीच्याही चॅट्सचा समावेश आहे.
कधी झाली अटक?
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोवाला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर.एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. येथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.