ETV Bharat / city

Amruta Fadnavis Tweet :'...सुनने में आया है __नामर्द है!' अमृता मॅडमची ट्विटरवर 100 मार्कची प्रश्नावली

ट्विटरवरील पोस्टनंतर नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांना धारेवर धरले आहे. अमृता फडणवीस या सामाजिक कार्य करतात. त्यामुळे राजकारणात पातळी सोडून त्यांनी असली ट्विट करू नये असा सूर त्यातील कमेंट्समधून दिसून येतो. त्याचप्रमाणे काहींनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटचे समर्थनही केले आहेत.

Amruta Fadnavis Tweet
Amruta Fadnavis Tweet
author img

By

Published : Jan 30, 2022, 4:41 PM IST

मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांचे वक्तव्य, व्हिडिओ तर कधी त्यांचे वादग्रस्त ट्विट खळबळ माजवतात. त्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोल देखील केले जाते. सध्या अमृता फडणवीस यांचे एक ट्विट पुन्हा चर्चेत आले आहे. ट्विटरवर त्यांनी 50-50 मार्कचे दोन प्रश्न टाकून नेटकऱ्यांना तो सोडवण्यासाठी दिला आहे.

  • थोडक्यात उत्तर द्यावे ...५० मार्क्स ;

    Naughty नामर्द,
    बिगड़े नवाब,
    नन्हें पटोले .....
    या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ?

    रिक्त स्थानो की पूर्ति करो ...५० मार्क्स !

    _____शराब नही होती !
    हरामख़ोर का मतलब _____है और
    सुनने में आया है _____नामर्द है !#WakeUp #Confused

    — AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'थोडक्यात उत्तरे द्या... रिक्त स्थानो की पूर्ती करो...'

ट्विटरवर त्यांनी दोन प्रश्न टाकत महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली असल्याचे बोलले जाते. ट्विटरवर त्यांनी, 50 मार्कसाठी थोडक्यात उत्तरे द्या असे म्हणत, Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले ... या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात? असा पहिला प्रश्न केला. तर रिक्त स्थानो की पूर्ती करो यासाठी 50 मार्कसाठी एक प्रश्न आहेत. यामध्ये _____शराब नही होती!, हरामख़ोर का मतलब _____है, आणि सुनने में आया है _____नामर्द है! असे प्रश्न केले आहेत.

रोख कोणाकडे -

अमृता फडणवीसांच्या ट्विटचा रोख कोणाकडे, असा प्रश्न केला जात आहे. यापूर्वी नॉटी, बिगडे नवाब, नन्हें पटोले असा उल्लेख करत सरकारमधील मंत्र्यांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. तर काही राजकीय नेत्यांनी देखील नामर्द असा उल्लेख केला होता. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी वेगवेगळ्या नेत्यांवर एकाच ट्विटमध्ये टीका केली असल्याचे बोलले जात आहे.

नेटकऱ्यांनी धरले धारेवर -

ट्विटरवरील पोस्टनंतर नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांना धारेवर धरले आहे. अमृता फडणवीस या सामाजिक कार्य करतात. त्यामुळे राजकारणात पातळी सोडून त्यांनी असे ट्विट करू नये, असा सूर त्यातील कमेंट्समधून दिसून येतो. तर काहींनी माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने नॉटी, नामर्द असे शब्द वापरून राजकीय पोस्ट करू नये याकडे लक्ष वेधले. शिवाय काही नेटकऱ्यांनी तर त्यांच्या प्रश्नावली मध्ये उत्तरे देखील भरली आहेत. तर काहींनी उपहासात्मक उत्तरे लिहिली आहेत. त्याचप्रमाणे काहींनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटचे समर्थनही केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.