ETV Bharat / city

Amruta Fadnavis Controversy: 'या' कारणांमुळे अमृता फडणवीस असतात चर्चेत, वाचा सविस्तर...

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर बँकर असलेल्या अमृता फडणवीस यांनी एका शासकीय खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे त्या कार्यरत असलेल्या बँकेतूनच होतील, यासाठी प्रयत्न केले. ही वादाची पहिली ठिणगी होती. त्यानंतर त्यांनी वर्षा बंगल्यावर एक गाय पाळली होती. गाईचे धारोष्ण दूध चेहऱ्यावर लावण्यासाठी गाय पाळण्यात आल्याची चर्चा आणि वाद निर्माण झाला होता.

author img

By

Published : Nov 11, 2021, 5:13 PM IST

अमृता फडणवीस
अमृता फडणवीस

मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या एका खासगी बँकेत उच्च पदावर कार्यरत होत्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर अमृता फडणवीस यांच्यात होत गेलेला बदल आणि त्यांचा झालेला मेक ओव्हर यासह त्यांनी केलेली विधान हा नेहमीच वादाचा भाग ठरला आहे. नेमक्या कोणत्या कारणांमुळे त्या चर्चेत राहिल्या, वादग्रस्त ठरल्या हे जाणून घेऊयात.

अमृता फडणवीस यांच्या संदर्भातील काही वाद

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर बँकर असलेल्या अमृता फडणवीस यांनी एका शासकीय खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे त्या कार्यरत असलेल्या बँकेतूनच होतील, यासाठी प्रयत्न केले. ही वादाची पहिली ठिणगी होती. त्यानंतर त्यांनी वर्षा बंगल्यावर एक गाय पाळली होती. गाईचे धारोष्ण दूध चेहऱ्यावर लावण्यासाठी गाय पाळण्यात आल्याची चर्चा आणि वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अमृता फडणवीस यांच्या गाण्याची आणि त्यांनी केलेल्या पेहरावाची जोरदार चर्चा झाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येत असताना वर्षा बंगल्याच्या भिंतीवर लिहिण्यात आलेल्या काही विधानांमुळेही अमृता फडणवीस चर्चेत आल्या होत्या. सत्ता गेल्यानंतर मात्र त्या सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून चर्चेत राहिल्या.

अमृता फडणवीस आणि ट्विट

ट्विटरच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकार आणि ठाकरे कुटुंबीयांवर सातत्याने प्रहार केले. चांगला नेता कायम न ठेवणे हा महाराष्ट्राचा दोष, जागो महाराष्ट्र, असे ट्विट करत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच 'ठाकरे आडनाव लावल्याने कोणी ठाकरे होत नाही', असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबीयांवर ट्विटच्या माध्यमातून टीका केली. मुंबईतील झाडे तोडीच्या मुद्दावर ट्विट करताना 'शिवसेनाही ढोंगी आहे, आपल्या सोयीप्रमाणे ते झाडांच्या कत्तलीसाठी विरोध करतात' या शब्दात त्यांनी ट्विट केले. बिहार निवडणूक निकालानंतर ट्विट करताना हा शिवसेनेचा उल्लेख शवसेना असा करीत शिवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारलं, अशी जहरी टीका त्यांनी केली. पुणे मेट्रोवरूनही त्यांनी टीका केली 'काम एक करते आणि हार दुसरेच घालून जातात, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई दरम्यान अमृता फडणवीस यांनी ट्विट करीत,' माजी गृहमंत्री हनिमूनला गेले काय? असा सवाल उपस्थित केला होता.

अमृता फडणवीस यांच्याशी जोडले नवे वाद

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जयदीप राणा या ड्रग्स पेडलरसोबत अमृता फडणवीस यांचे संबंध असल्याचा जोरदार आरोप केला. या आरोपांमुळे व्यथित झालेल्या फडणवीस यांनी मलिक यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. मात्र, त्यापाठोपाठ काँग्रेसनेही समृद्धी महामार्ग लगतची जमीन अमृता फडणवीस यांनी शेतकऱ्यांकडून कमी भावात खरेदी करून सरकारकडून प्रचंड रक्कम मिळवण्याचा अप्रत्यक्ष आरोप केला आहे.

हेही वाचा - Gujarat Drug Case : दीड ग्रॅम ड्रग्ज पकडणाऱ्याने द्वारकेतल्या 350 किलो ड्रग्जचा तपास करावा - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.