ETV Bharat / city

Amit Thackeray Appeal : 'मेट्रो कारशेडच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा'; नवीन सरकारच्या निर्णयाविरोधात अमित ठाकरे मैदानात

राज्यात नव्याने स्थापन झालेले भाजपच्या पाठिंब्याचे शिंदे सरकारने ( Shinde government ) मुंबई मेट्रो 3 कारशेड ( Mumbai Metro 3 Carshed ) आता आरे काॅलनीत स्थलांतरित ( Migrated to Aarey Colony ) करण्याचा निर्णय घेतला. आता या निर्णयाविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे ( MNS leader Amit Thackeray ) या यांनी सरकारला आवाहन केले आहे की, या निर्णयाचा पुनर्विचार करावा. पर्यावरणाच्या दृष्टीने हा निर्णय हानिकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Amit Thackeray
अमित ठाकरे
author img

By

Published : Jul 3, 2022, 12:10 PM IST

मुंबई : महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे ( Shinde government ) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुंबई मेट्रो 3 कारशेड ( Mumbai Metro 3 Carshed ) आरे कॉलनीत स्थलांतरित ( Migrated to Aarey Colony ) करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे ( MNS leader Amit Thackeray ) यांनी नव्याने स्थापन झालेल्या सरकारला या निर्णयासंदर्भात पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.

Amit Thackeray Appeal
अमित ठाकरेंचे सरकारला आवाहन

धक्कादायक निर्णय : अमित ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की, "नवीन सरकारचा हा नवा निर्णय मला आणि असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी आणि कार्यकर्ते यांना धक्कादायक आहे. राज्यातील तरुणांनी या निर्णयाविरोधात यापूर्वी जोरदार संघर्ष केला. काहींना तुरुंगातही टाकण्यात आले होते."

माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही : मनसे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकरे पुढे म्हणाले की, "आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्‌ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ही आग्रहाची विनंती."

उद्धव ठाकरे यांनीसुद्धा केले होते आवाहन : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर आपल्या पहिल्या जाहीर भाषणात उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर सडकून टीका केली. मुंबई मेट्रो 3 कारशेड आरे कॉलनीतून स्थलांतरित करण्याच्या मागील महाविकास आघाडीच्या (MVA) निर्णयाला नकार देण्यात आला होता. पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव म्हणाले, सध्याचे शिंदे सरकार आपल्यावर आपला राग काढण्यास मोकळे आहे. परंतु, माझ्यावरचा राग आरेवासीयांवर काढू नका, असा इशारा दिला.

.......आणि वादाला तोंड फुटलं : दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मेट्रो 3 चे अर्धे काम झाले असले तरी, कारशेड पूर्ण होत नाही तोपर्यंत मेट्रो सुरू होऊ शकत नाही, असे सांगत वादाला तोंड फोडले. ते म्हणाले की, महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारने प्रस्तावित केलेली जमीन अद्याप वादात आहे आणि जमीन मिळाल्यानंतरही सुमारे 4 वर्षे काम होऊ शकत नाही. त्यामुळे जिथे हे काम 25 टक्के झाले आहे. तिथेच मेट्रो 3 ची कारशेड होईल, असे जाहीर केले.

हेही वाचा : Vidhan Sabha Speaker Election : भाजपच्या राहुल नार्वेकरांनी बहुमत जिंकले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.