ETV Bharat / city

Water Tunnel Mining Work: अमरमहल ते परळ भूमिगत जलबोगदा अवघ्या दहा महिन्यांत पूर्ण

पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी सुमारे ९.८ किलोमीटर लांब अंतराच्या भूमिगत जलबोगदा प्रकल्प अंतर्गत अमरमहल ते वडाळा आणि वडाळा ते परळ अशा दोन टप्प्यात खनन करण्यात येत आहे. ( Water Tunnel Mining Work ) अमरमहाल ते वडाळा या पहिल्या टप्प्यातील ४.३ किलोमीटर लांब जलबोगद्याचे खनन काम अवघ्या १० महिन्यांत म्हणजे नियोजित कालावधीच्या ४ महिने आधीच पूर्ण झाले आहे.

अमरमहल ते परळ भूमिगत जलबोगदा अवघ्या दहा महिन्यांत पूर्ण

author img

By

Published : Aug 8, 2022, 6:33 PM IST

मुंबई - मुंबईमधील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी सुमारे ९.८ किलोमीटर लांब अंतराच्या भूमिगत जलबोगदा प्रकल्प अंतर्गत अमरमहल ते वडाळा आणि वडाळा ते परळ अशा दोन टप्प्यात खनन करण्यात येत आहे. ( Water Tunnel Mining Work In Mumbai ) अमरमहाल ते वडाळा या पहिल्या टप्प्यातील ४.३ किलोमीटर लांब जलबोगद्याचे खनन काम अवघ्या १० महिन्यांत म्हणजे नियोजित कालावधीच्या ४ महिने आधीच पूर्ण झाले आहे. महापालिकेने कमी वेळात हे काम पूर्ण करून विक्रमी नोंद केली आहे.

४ महिने आधीच खनन काम पूर्ण - पाणीपुरवठा प्रकल्प विभागामार्फत अमरमहल ते वडाळा व पुढे वडाळा ते परळ हा एकूण ९.८ किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगदा बांधण्याचा प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे. जल बोगदा खनन करण्यासाठी टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) देखील कार्यरत आहे. प्रकल्पातील दोन बोगद्यांपैकी पहिल्या टप्प्यातील हेडगेवार उद्यान (अमरमहाल) ते प्रतीक्षा नगर (वडाळा) दरम्यानच्या सुमारे ४.३ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खनन दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु करण्यात आले होते. सुमारे १४ महिने कालावधीत म्हणजे डिसेंबर २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. अंदाजे सुमारे १४ महिने कालावधी असताना ४ महिने आधीच अवघ्या दहा महिन्याच्या कालावधीत कामाची विक्रमी नोंद केली आहे. हे खनन काम पूर्ण होवून टीबीएम मशीन बाहेर पडले आहे.

एप्रिल २०२६ पर्यंत संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित - दरम्यान वडाळा ते परळ या दुसऱ्या टप्प्यातील भूमिगत जलबोगद्याचे खनन दीड महिन्यानंतर सुरु होणार आहे. पहिला टप्पा पूर्ण करुन बाहेर पडलेले बोगदा खनन सुमारे ८ अंशात फिरवून दुसऱ्या टप्प्यातील कामास सुरुवात केली जाणार आहे. अमरमहाल ते परळ हा या प्रकल्पाचे आजपर्यंत ३४ टक्के काम पूर्ण झाले आहे. नियोजित वेळेत म्हणजेच एप्रिल २०२६ पर्यंत संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होईल, असे पालिकेने म्हटले आहे. सदर जलबोगद्याद्वारे एफ/उत्तर, एफ/दक्षिण तसेच ई आणि एल विभागातील काही परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य होणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये -

  • १) सदर जलबोगद्याद्वारे एफ/उत्तर, एफ/दक्षिण त्याचप्रमाणे ई आणि एल विभागातील काही परिसरातील नागरिकांना सन २०६१ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
  • २) हा जलबोगदा सुमारे १०० ते ११० मीटर इतक्या खोलीवर असून त्याचा व्यास सुमारे ३.२ मीटर इतका आहे.
  • ३) या प्रकल्प अंतर्गत तीन कूपकांचे (shafts) बांधकाम समाविष्ट आहे. हेडगेवार उद्यान येथील ११० मीटर व प्रतीक्षा नगर येथील १०४ मीटर खोलीच्या दोन कूपकांचे काम पूर्ण झाले आहे. तर परळ येथील १०१ मीटर खोलीच्या कूपकाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
  • ४)पहिल्या टप्प्यातील जलबोगद्याच्या बांधकामादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनेक नवे विक्रम केले आहेत.
  • 5)यामध्ये हेडगेवार उद्यान येथील ९६.१५ मीटर खोलीच्या कूपकाच्या आरसीसी अस्तरीकरणाचे काम फक्त २९ दिवसात पूर्ण केले.
  • 6)एका महिन्यात ६०५ मीटर लांबीच्या जलबोगद्याचे विक्रमी खोदकाम जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण केले.
  • 7)विविध अडचणींना तोंड देत एका दिवसात सर्वोच्च अशा ३४.५ मीटर लांबीचे जल बोगद्याचे खोदकाम करण्यात यश आले.

हेही वाचा - CWG 2022 : सात्विक-चिराग जोडीने बॅडमिंटनमध्ये जिंकले सुवर्णपदक; इंग्लंडच्या जोडीवर केली मात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.