ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक

author img

By

Published : Jan 21, 2022, 7:17 AM IST

रोज कोरोना रुग्णांची (Maharashtra Corona Update) संख्या वाढत असल्याची आकडेवारी येते आणि भीतीचे वातावरण निर्माण होते. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. (Number of corona patients in Maharashtra) गेल्या 24 तासात 46 हजार 197 रुग्ण आढळून आले आहेत. पैकी 37 रुग्णांचा मृत्यू झाला असून 52 हजार रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. (Number of corona patients in Maharashtra) गेल्या 24 तासात 46 हजार 197 रुग्ण आढळून आले आहेत. पैकी 37 रुग्णांचा मृत्यू झाला असून 52 हजार रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. (Maharashtra Corona Update 2022) सक्रिय रुग्ण मात्र अडीच लाखाच्या आसपास आहेत. (corona patients recovery rate is higher) दुसरीकडे ओमायक्रोनचे 125 रुग्ण सापडले असून सर्व रुग्ण पुण्यातील आहेत, असा दावा राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत चढ-उतार होताना दिसत आहेत. बुधवारी 43 हजार 697 रुग्ण सापडले होते. आज रुग्ण संख्येचा आकडा 46 हजार 197 वर पोहचला आहे. त्यापैकी 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.92% एवढा आहे. तर 52 हजार 25 इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत 69 लाख 67 हजार 432 करोना बाधित ठणठणीत बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 94.52% एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 27 लाख 45 हजार 348 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 73 लाख 71 हजार 727 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 24 लाख 21 हजार 501 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3391 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 लाख 58 हजार 569 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ओमायक्रोनचे 125 रुग्ण

राज्यात आज ओमायक्रोनचे 125 नव्या बाधितांची नोंद झाली. हे सर्व रुग्ण पुण्यातील आहेत. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने 87 तर 38 रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळने तपासले आहेत. त्यामुळे आजपर्यंत 2 हजार 199 एवढे रुग्ण आहेत. 1 डिसेंबरपासून आजपर्यंत 2 लाख 99 हजार 952 प्रवासी मुंबई, पुणे आणि नागपूर विमान तळावर उतरले. एकूण 94 हजार 9 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 570 आणि इतर देशातील 663 अशा एकूण 1233 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर आजपर्यंतच्या 5530 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 96 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

मुंबई महापालिका - 5708
ठाणे - 492
ठाणे मनपा - 1064
नवी मुंबई पालिका - 1300
कल्याण डोबिवली पालिका - 526
मीरा भाईंदर - 311
वसई विरार पालिका - 352
नाशिक - 896
नाशिक पालिका - 1799
अहमदनगर - 301
अहमदनगर पालिका - 1189
पुणे - 2972
पुणे पालिका - 7252
पिंपरी चिंचवड पालिका - 3889
सातारा - 1459
नागपूर मनपा - 3203

ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण

पुणे मनपा- 865
मुंबई - 687
पिंपरी चिंचवड - 118
नागपूर - 116
सांगली - 59
मीरा भाईंदर - 52
सांगली - 59
पुणे ग्रामीण - 56
मीरा-भाईंदर - 54
ठाणे मनपा - 50
अमरावती - 25
औरंगाबाद - 20
कोल्हापूर - 19
पनवेल - 18
सातारा - 14
नवी मुंबई - 13
उस्मानाबाद, अकोला, कल्याण डोंबिवली - 11
वसई - विरार - 7
भिवंडी मनपा - 5
अहमदनगर, नाशिक - 4
नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया आणि लातूर - 3 प्रत्येकी
गडचिरोली, नंदुरबार, सोलापूर आणि परभणी - 2 प्रत्येकी
रायगड, भंडारा, जळगाव आणि वर्धा - प्रत्येकी 1
इतर राज्य - 1

हेही वाचा - Jitendra Awhad On Amol Kolhe : अमोल कोल्हेंच्या चित्रपटाला विरोध करणार, आव्हाड आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.