ETV Bharat / city

Mumbai Rain - पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - What Aditya Thackeray said

सततच्या पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका असतो. पुढील चार ते पाच दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेसह इतर सर्व यंत्रणांनी घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी. तसेच, समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा त्यांनी आज दृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला, त्यानंतर ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jul 18, 2021, 9:48 PM IST

मुंबई - हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवसांत पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेसह इतर सर्व यंत्रणांनी घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी. तसेच, समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा त्यांनी आज दृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला, त्यानंतर ते बोलत होते. या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते.

'सततच्या पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका'

सततच्या पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका असतो. पालिकेने अशा ठिकाणांवर लक्ष ठेवावे. जेणेकरून अनपेक्षित दुर्घटना टाळता येतील. चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक भिंतीवरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने, मोठ्या प्रमाणावर मलबा पसरून प्राणहानी झाली. गेल्यावर्षीही मलबार हिल येथे टेकडीचा भाग अचानक खचला होता. उच्च दाबाच्या विद्यूत वाहिन्यांच्या टॉवर्सखाली मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत, त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सांगून खबरदारी घ्यावी. दरम्यान, भूमिगत वाहनतळामध्ये पाणी घुसले व वाहनांचे नुकसान झाले. भांडूप येथे जल शुद्धीकरण केंद्रच बंद पडले आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने अधिक सावधगिरी बाळगावी, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या आहेत.

'सर्वच यंत्रणांनी सतर्क राहावे'

पावसाचा जोर रात्री वाढतो आहे. पाणी उपसा करणारी यंत्र सतर्क ठेवावीत. मोडकळीस आलेल्या इमारती, मग त्या पालिका किंवा म्हाडाच्या अखत्यारीतील असोत, खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून त्यांना स्थलांतरित करा. तसेच, सर्वच यंत्रणांनी बचाव पथके तयार ठेवावीत. आपापल्या नियंत्रण कक्षांना एकमेकांशी सातत्याने संपर्कात राहावे, कोविड केंद्र व फिल्ड रुग्णालयांतील डॉक्टर्स व वैद्यकीय पथकांनाही मदतीसाठी तयार ठेवावे. तसेच, अर्धवट बांधकामे, मेट्रोची व इतर कामे यामधून भरपूर पाऊस झाल्यास पाणी साचून दुर्घटना होऊ नये, त्यानंतरही त्या ठिकाणी पाणी साचलेले राहून मलेरिया, डेंग्यू, लेप्टो सारखे रोग पसरवू नयेत म्हणून, विशेष काळजी घ्यावी व पाण्याचा निचरा लगेच होईल हे पाहावे, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

'फिव्हर क्लिनिक्स सुरु करा'

पावसाळ्यात आजार डोके वर काढतात, या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची सूचना केली. पाऊस ओसरल्यावर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते, कोविडचा धोका तर कायम आहे, यासाठी ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक्स सुरु करा. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी देखील नागरिकांना त्यांच्या तापाबाबत तपासणी व मार्गदर्शन हवे. गृहनिर्माण संस्थांमधून देखील याविषयी जनजागृती करा, अशा सूचना त्यांनी केल्या. मुंबईत दरडी कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षक भिंती आहेत. मात्र, अशा सर्वच ठिकाणांचा आयआयटी किंवा इतर तज्ञ संस्थेमार्फत अभ्यास करून आणखी काही पर्याय आहेतका? किंवा त्यांच्या मजबुतीकरणासंदर्भात पाऊले उचलता येतीलका? ते पाहावे.

'पुढील तीन दिवस महत्वाचे'

रेल्वे आणि बेस्ट यामध्ये अधिक चांगला समन्वय साधून अशा आपत्तीच्या वेळी प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून हॉटलाईन सुरु करावी, असेही मंत्री ठाकरे म्हणाले. पुढील तीन दिवस महत्वाचे असून, मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु राहील याची काळजी घ्यावी व पर्यायी व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले आहे. वीज वाहिन्या व त्यांचे खांब सुस्थितीत राहतील आणि त्यातून विजेचा धक्का लागणार नाही याविषयी कंपन्यांना खबरदारी घेण्यास सांगावे असे, पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

'पालिकेचे अधिकारी-कर्मचारी २४ तास ड्युटीवर'

काल रात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस कोसळून अवघ्‍या काही तासांमध्‍ये २०० मिली मीटरपेक्षा जास्‍त पावसाची नोंद झाली आहे. या पावसात वाशीनाका परिसरातील वंजारतांडा येथे संरक्षक भिंत कोसळली. तसेच, विक्रोळीतील पंचशील चाळीवर दरडीचा भाग कोसळला. या दोन प्रमुख दुर्घटनांसह अन्‍य एक घटना मिळून एकूण २७ नागरिकांचा दुर्दैवी मृत्‍यू ओढवला आहे. या दुर्घटनांच्‍या स्‍थळी बचाव आणि मदतकार्य तातडीने करण्‍यात आले आहे. पालकमंत्री आदित्‍य ठाकरे आणि अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त आश्‍विनी भिडे यांच्‍यासह भेटी देवून यंत्रणांना आवश्‍यक ते निर्देश दिल्‍याचेही चहल यांनी नमूद केले आहे. माहूल येथील पर्जन्‍य जल उदंचन केंद्राचे बांधकाम लवकरच सुरु होणार असून, हे केंद्र पूर्ण झाल्‍यानंतर कुर्ला, शीव, चुनाभट्टी इत्‍यादी परिसरातील पाणी साचण्‍याचा प्रश्‍न निकाली निघेल, असेही चहल म्हणाले आहेत.

'मलेरियाचे प्रमाण यंदा पूर्णपणे नियंत्रणात'

मुंबईत पावसामुळे होणाऱ्या भूस्‍खलन घटना पाहता, संभाव्‍य ठिकाणांवर महानगरपालिका प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. अशा ठिकाणांवरील नागरिकांचे स्‍थलांतर व पुनर्वसन करण्‍याबाबतची कार्यवाही देखील करण्‍यात येत आहे, असे आयुक्‍तांनी नमूद केले. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त सुरेश काकाणी म्‍हणाले. मलेरिया, डेंगी आणि लेप्‍टो या आजारांचा फैलाव होवू नये म्‍हणून आवश्‍यक प्रतिबंधक उपाययोजना देखील सातत्‍याने सुरु आहेत. मलेरियाचे प्रमाण यंदाही पूर्णपणे नियंत्रणात असून, आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात असल्‍याचे काकाणी यांनी नमूद केले.

'पाणीपुरवठा सुरळीत होईल'

पावसाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात शिरून समस्या निर्माण झाल्यासंदर्भात महानगरपालिकेचे उपआयुक्‍त अजय राठोर म्‍हणाले की, भांडुप संकुलातील नवीन आणि जुन्‍या अशा दोन्‍ही उदंचन केंद्रातील यंत्रणा हळूहळू कार्यान्‍व‍ित होत आहे. भांडुप येथील मुख्‍य जलसंतुलन कुंभातील पाणीपातळी उंचावत आहे. मात्र, असे असले तरी, उद्या एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्‍याची शक्‍यता आहे. सर्व यंत्रणा कार्यान्‍व‍ित होताच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती राठोर यांनी दिली.

'हवामान विभागाचा ऑरेंज इशारा'

मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट असून ५० ते ६० किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. २३ ताराखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो, असे हवामान विभागाचे जयंता सरकार म्हणाले आहेत. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी सध्यस्थितीची माहिती दिली. बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील मार्गदर्शन केले व यंत्रणांनी अधिक समन्वय ठेवाव्यात असे सांगितले. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव असीम गुप्ता, मुंबई शहर व मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, सर्व पालिका उपायुक्त यावेळी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.