मुंबई - अक्षय्य तृतीया ( Akshaya Tritiya 2022 ) हा हिंदू धर्मातील मोठा आणि शुभ सण असा मानला जातो. त्यामुळे हिंदू धर्मिय या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदीसाठी पसंती देतात. त्यामुळे उद्या (मंगळवारी) राज्यातच नाही, तर देशभरात सोने बाजारात मोठी उलाढाल ( Large turnover in gold market ) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केवळ महाराष्ट्रातच जवळपास साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयाची तर देशभरात हजार ते बाराशे कोटी रुपयांची होणार उलाढाल होण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन वर्षापासून देशभरामध्ये असलेला कोविडचा प्रादुर्भावामुळे जवळ जवळ सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. त्याचा फटका सोने व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात बसला होता. मात्र असे असले तरी, कोविडच्या काळामध्ये सोन्याच्या दरात मोठी उसळ पाहायला मिळाली. कोविड काळाच्या आधी 35 ते 36 हजार रुपये तोळे दर असलेले सोने थेट 58 हजारापर्यंत गेले होते. त्यातच कोविड काळामध्ये सामान्य नागरिकांची बंद झालेली आवकामुळे सामान्य नागरिकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र आता सर्व नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. सर्वच व्यवसाय आता खुले झाले असून सोने खरेदीत मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होत आहे. त्यामुळे या अक्षय्य तृतीयापासून मोठ्या प्रमाणात सोने खरेदीकडे लोकांचा ओघ असेल, अशी आशा सोने व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.
अक्षय्य तृतीयानंतर देशभरात होणार मोठी उलाढाल : अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ सणा पैकी एक सण मानला जातो. या दिवशी हिंदु धरणांचा सोने खरेदीवर जास्त भर असल्यामुळे उद्यापासून सर्वसामान्यांकडून सोने खरेदीची लगबग सुरू होईल, अशी आशा सोने व्यापारी आणि इंडियन बुलियन अंड ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी व्यक्त केली आहे. आता सोन्याचा दर 52 हजार 500 रुपयाच्या आसपास असला तरी, उद्या त्यामध्ये किंचितशी वाढ होण्याची शक्यता देखील त्यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. नुकताच झालेला गुढीपाडवा सणाला देखील सोने खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवली. मात्र उद्यापासून सोने खरेदीत तेजी येईल, असा विश्वास व्यापाऱ्यांना आहे. केवळ मुंबईतच अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर दीडशे कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. तर तिथेच महाराष्ट्रात 300 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या सोबतच संपूर्ण देशभरामध्ये हजार ते बाराशे कोटी रुपयेपर्यंत अक्षय तृतीयाच्या सणाला सोने बाजारामध्ये उलाढाल होण्याची शक्यता सोने व्यापारी कुमार जैन यांनी वर्तवली आहे.
लग्नसराईमुळे सोने व्यापारात तेजी येणार : गेली दोन वर्ष कोविडच्या प्रादुर्भावामुळे देशभरात अनेक कुटुंबांनी लग्न थांबवली होती. मात्र आता कोविडचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला आहे. त्यामुळे धुमधडाक्यात लग्न करण्यासाठी कुटुंबाकडून तयारी केल्या जात आहेत. केवळ मुंबई आणि महाराष्ट्रात जुन पर्यंत दहा लाख लग्न लावली जाणार आहेत. त्यापैकी 60 टक्के लग्न हे ग्रामीण भागात असून 40% लग्न शहरी भागात आहेत. तर संपूर्ण देशभरात जून महिन्यापर्यंत जवळपास 40 लाख लग्न होणार आहेत. या सर्व लग्नांमध्ये मोठ्या प्रमाणात सोने खरेदीवर भर दिला जाईल, असा विश्वास कुमार जैन यांनी व्यक्त केला. तसेच कोविड काळापासून सोन्याचे महत्त्व देखील लोकांना समजले आहे. अडचणीच्या काळात घरात असलेल्या सोन्याची मदत होते. त्यामुळे इतर वस्तू नवदांपत्यांना भेट देण्यापेक्षा नातेवाइकांकडून सोने खरेदी करून भेट वस्तू देण्यावर जास्त कल आता पाहायला मिळतो. जेणेकरून अडीअडचणीच्या काळात सोन्याचा उपयोग त्या दांपत्याला करता येईल. म्हणून सोने खरेदी वर भर असल्याचे सांगितले जाते.
आंतरराष्ट्रीय घटनांचा सोने दरावर परिणाम : 58 हजार रुपये तोळे एवढा सोन्याचा दर काही दिवसांपूर्वी झाला होता. मात्र आता तो दर पुन्हा एकदा कमी झाला असून 52 हजार 500 रुपये पर्यंत आला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडींमुळे सोन्याचा दर अजून वाढण्याची शक्यता असून येणाऱ्या काही महिन्यात तो दर 60 हजारापर्यंत देखील जाऊ शकतो, अशी शक्यता कुमार जैन यांनी वर्तवली आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते. सध्या युक्रेन आणि रशियाच्या युद्ध काहीसे शांत झाले असले तरी हे युद्ध पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्यास त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर होऊन तो दर 60 हजारापर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते आहे. तसेच केवळ भारतातच नाही तर, जगभरात सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र जवळपास दरवर्षी तीन हजार टन सोने बाजारात येते. त्यात सगळ्यात जास्त चीन आणि त्यानंतर भारतात सोन्याची खरेदी केली जाते. मात्र आता जगभरातूनच सोन्याच्या खरेदीकडे असल्यामुळे दर वाढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा - Dada Bhuse comment on Malegaon : मालेगाव विकासाच्या वाटेवर, धार्मिक सलोखा कायम राहील - कृषी मंत्री दादा भुसे