मुंबई- राज्यात कोरोनाचे सावट असले तरी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेली अक्षयतृतीया ही साध्या पद्धतीने अनेक ठिकाणी साजरी करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे सोन्याची विक्री करणारे दागिने बंद राहिली आहेत. त्यामुळे सराफा व्यवसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्यांमधील विविध मंदिरात पारंपारिक पद्धतीने अक्षयतृतीय साजरी करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या काळातील नियमांमुळे या मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश नव्हता.
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात विठ्ठलाचे गोजिरे रुप
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात विठ्ठलाच गोजिर रूप रेखाटण्यात आले आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात चंदन उटीच्या साह्याने समधीवरती सावळ्या विठुरायची मूर्ती रेखाटण्यात आली आहे. विना मंडपात व समाधी मंदिरात मोगरा व इतर रंगेबिरंगी फुलांनी अक्षय तृतीयेनिमित्त खास सजविले आहे. या मंदिरातील दृश्य अत्यंत विलोभनीय आहेत.
हेही वाचा-काँग्रेसच्या मंत्र्याने केले गडकरींचे कौतुक, फडणवीसांना काढला चिमटा
कर्जतमध्ये अनोख्या पध्दतीने अक्षय्य तृतीया साजरी
अक्षय्य तृतीयेनिमित्त श्री. माऊली निवास कर्जत येथे श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांना श्री. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समिती कर्जत आणि कर्जत मधील भाविकांच्या सहाय्याने श्री. माऊलींच्या चरणी 525 आंबे अर्पण करून आंब्यांची आरास करण्यात आली. अनोख्या पध्दतीने अक्षय्य तृतीया सण साजरा केला. यावेळी पहाटे श्री. माऊलींची षोडशोपचारे महापूजा करण्यात आली असून शासकीय नियमांचे पालन करुन सर्व विधी पार पडल्या.
हेही वाचा-ऑक्सिजन टॅंक संपला, मात्र हिम्मत कायम ठेवली; डॉक्टरांनी वाचवले २७० रुग्णांचे प्राण
अक्षय तृतीयानिमित्त खान्देशात झोखे खेळण्याची रूढी कायम
धुळे - अक्षय तृतीय या सणाचा खान्देशात गोडवा वाढवण्याचं काम करते ती खापराची पुरणपोळी. एरवी आपण ताव्यावर तयार करण्यात आलेली छोटीशी पुरणाची पोळी पसंत करतो, मात्र खान्देशातील मातीच्या खापरावर बनविण्यात आलेली हि पुरणपोळी आपण एकदा चाखली की, मग गोड पदार्थात आपण या पुराणपोळीला प्रथम पसंती द्याल. देश विदेशात गेलेले खान्देशातील चाकरमाने खास आखाजी म्हणजेच अक्षय तृतीयेला हि खापराच्या पुरणपोळीचा स्वाद चाखण्यासाठी आपल्या मायभूमीत येतात. कोरोनाची भिती असली तरी प्रत्येक खानदेशी कुटुंबीय हा सण साजरा करतात.
अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आंबा महोत्सव-
अक्षतृतीयेच्या मुहूर्तावर पुणेकरांचे लाडके दैवत असलेल्या श्रीमंत दगडुशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली. दरवर्षी ही आंब्याची आरास बाप्पाला केली जात असते. मोठ्या उत्साहात भक्तांच्या गर्दीत आंबा महोत्सव परंपरेने होत असतो मात्र कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी बाप्पा चा हा आंबा महोत्सव साधेपणाने साजरा झाला यंदाही
कोरोनाचे सावट कायम असल्याने यावर्षीही मंदिरात अक्षयतृतीया साध्या पध्दतीने साजरी केली जात आहे. दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे. बाप्पाला आरास केलेले हे आंबे दुसऱ्या दिवशी बाप्पाचा प्रसाद म्हणून ससुन रुग्णालयात रुग्णांना दिला जातो. कोरोनाचे सावट पाहता मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली असुन रोडवरुनच भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले.