ETV Bharat / city

Ajit Pawar : 'एवढे मोठे मंत्रिमंडळ की... '; अजित पवारांनी शेलक्या शब्दात घेतली शिंदे सरकारची फिरकी

राज्यात नवीन सरकार आल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. राज्यात पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाला आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारला घेरले आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने अनेक फाइल्स पडून आहेत. सगळा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. अनेक विकासाची कामे रखडली आहेत. मुख्यमंत्र्यांना मात्र याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असे पवार म्हणाले.

Ajit Pawar
अजित पवार
author img

By

Published : Aug 2, 2022, 4:49 PM IST

Updated : Aug 2, 2022, 5:32 PM IST

मुंबई - राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून जवळपास महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी एवढा मोठा मंत्रिमंडळ की खुर्च्या एकमेकांकडे टक बघतात अशा शेलक्या शब्दात शिंदे सरकारची फिरकी घेतली. पवारांच्या तिरकस बॅटिंगमुळे पत्रकार परिषदेत जोरदार हशा ( Ajit Pawar criticized Shinde government ) पिकला.

अनेक विकास कामे रखडली - राज्यात नवीन सरकार आल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. राज्यात पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाला आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारला घेरले आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने अनेक फाइल्स पडून आहेत. सगळा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. अनेक विकासाची कामे रखडली आहेत. मुख्यमंत्र्यांना मात्र याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असे पवार म्हणाले.

'बिनखात्याचे मंत्री' - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथविधी होऊन एक महिना झाला. दोनच मंत्री आजवर मंत्रिमंडळ बैठक घेत आहेत. मंत्रिमंडळात खरे तर ४२ मंत्री असतात, तरीही मुख्यमंत्र्यांना ताण असतो. इथे एकटेच मुख्यमंत्री सर्व खाती सांभाळत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. ते बिनखात्याचे मंत्री आहेत, असा चिमटा अजित पवार यांनी काढला. तसेच एवढ मोठं मंत्रिमंडळ आहे, की खुर्च्या टक लावून एकमेकांकडे बघत आहेत, अशी खिल्ली अजित पवार यांनी उडवली. कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ करायचा नाही असे अंतर्गत ठरला आहे, असे बोलले जाते असेही पवार म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार असताना सात जणांचे मंत्रिमंडळ होते. राष्ट्रवादीकडे असलेली खाती छगन भुजबळ आणि जयंत पाटील, शिवसेनेचे एकनाथर शिंदे आणि सुभाष देसाई यांच्याकडे तर काँग्रेसची बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांच्याकडे होती. आत्ताचे मुख्यमंत्री तेव्हा गृहमंत्री होते. राष्ट्रवादीला गृहमंत्री की नगरविकास खाते द्यायचे हे ठरत नव्हते. त्यामुळे खाती वाटप केले नव्हते हे आरोप तथ्यहीन असल्याचे पवार म्हणाले.

हेही वाचा - धक्कादायक: मोबाईलवरुन 'सेक्सटिंग'च्या प्रमाणात वाढ, अशी ठेवा पाल्यांवर नजर

Last Updated : Aug 2, 2022, 5:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.