मुंबई: मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सीबीआयचे कार्यालय आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की कार्यालयात काम करणाऱ्या 235 लोकांची कोरोना चाचणी करण्यास सांगितले होते. 235 पैकी 68 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या करोनाबाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांतील 93 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. यानंतर, आता मुंबई पोलीस विभागातील संक्रमितांचा आकडा 9,657 वर पोहोचला आहे, यांपैकी जवळपास 123 जवानांचा मृत्यू झाला आहे. सध्या 409 बाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
CBI personnel Positive : मुंबई पोलिसांनंतर 68 सीबीआय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण - मुंबई पोलिस
मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. ( The number of corona patients is increasing ) मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) नंतर आता केंद्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात देखील कोरोनाचा शिरकव झाला आहे. सीबीआयच्या मुंबई कार्यालयात ( Mumbai office of CBI ) शनिवारी करोनाचा स्फोट झाला. या कार्यालयातील 235 कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली होती त्यापैकी तब्बल 68 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.