मुंबई - 'सत्यमेव जयते' असे बोलत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत कोणी गैर करत असेल, कोणी अन्याय करत असेल तर, त्या विरोधात माझा लढा कायम सुरूच राहणार आहे, असे स्पष्ट शब्दात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik tweet) यांनी सांगितले.
हेही वाचा - ST संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव; गुणरत्न सदावर्तेंचा मुंबई उच्च न्यायालयात दावा
समीर वानखेडे यांच्या वडिलांनी (dnyandev wankhede slapped defamation case) नवाब मलिक यांना कुटुंबाच्या विरोधात बोलण्यापासून रोखण्यासाठी उच्च न्यायालयात (defamation case nawab malik) दाद मागितली होती. परंतु, उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना बोलण्यापासून रोखता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
या देशामध्ये बोलण्यावर बंदी कुणी घालू शकत नाही. जर, एखादी व्यक्ती जबाबदारीने बोलत असेल तर, प्रत्येक नागरिकाचा तो मौलिक अधिकार आहे. परंतु, काही लोकांना हे कळले नाही, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे (sameer wankhede father) यांनी नवाब मलिक यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात १.२५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोशल मीडियावर आपल्या कुटुंबीयांबद्दल प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर बंदी यावी, अशी मागणीही ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. त्यावर उच्च न्यायालयात आज युक्तिवाद झाला.
उच्च न्यायालयाने काय म्हटले?
न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, कोणतेही ट्वीट करण्यापूर्वी नवाब मलिक यांनी संबंधित माहिती ही खरी आहे की, खोटी, या संदर्भात सर्व माहिती घेऊनच ट्वीट करावे, असे देखील न्यायालयाने यावेळी सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे.
नवाब मलिक यांचे नवीन ट्विट -
तर, न्यायालयाच्या निर्णयानंतर नवाब मलिक यांनी पुन्हा ट्विट केले. 'सत्यमेव जयते, अन्याय के खिलाफ हमारी जंग जारी रहेगी,' असे ट्विट त्यांनी केले.
हेही वाचा - 'चौकीदारही...' वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा