ETV Bharat / city

दहावीच्या गुणपत्रिकेवरच पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश, उदय सामंत यांची माहिती - पॉलिटेक्निक प्रवेश

तंत्र शिक्षण विभागामार्फत पॉलिटेक्निक विभागात प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. दहावीच्या निकालावरच पॉलिटेक्निकमध्ये अॅडमिशन होणार आहेत. लोकांच्या मनात भीती होती, मात्र दहावीच्या मार्कलिस्टवर अ‌ॅडमिशन दिले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

Polytechnic admission
Polytechnic admission
author img

By

Published : Jun 18, 2021, 6:58 PM IST

मुंबई - तंत्र शिक्षण विभागामार्फत पॉलिटेक्निक विभागात प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. दहावीच्या निकालावरच पॉलिटेक्निकमध्ये अडमिशन होणार आहेत. लोकांच्या मनात भीती होती, मात्र दहावीच्या मार्कलिस्टवर अ‌ॅडमिशन दिले जाईल. परंतु, यंदा काही बदल केले आहेत पॉलिटेक्निच्या दुसऱ्या वर्षासाठी दोन विषय कम्पलसरी केले होते. आता १४ पैकी ३ विषय कम्पल्सरी असतील.

उदय सामंत म्हणाले, की UGC ला मातृभाषेमध्ये शिक्षण देण्याची शिफारस केली हाती. मातृभाषेतून शिक्षणासाठी परवानगी मागितली आहे. मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे. यंदापासून मराठी आणि इंग्रजी भाषा हे ऑप्शन असतील. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मुलांसाठी वादग्रस्त शब्द होता. तो यंदापासून काढून टाकला आहे. जनतेच्या भावना दुखवायच्या नाहीत, अशी मुख्यमंत्री यांची भावना होती. त्यानुसार आता बदल केला आहे आणि विवादित शब्द काढला आहे. जेणेकरून सीमाभागातील मुलांना महाराष्ट्रातील असल्याचा फील येईल.

सामंत म्हणाले, की काश्मीरमधील विस्थापितांनाही पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश मिळेल. दहावीनंतर मार्कलिस्ट पाहूनच प्रवेश दिला जाईल. पूर्वी सीईटी द्यावी लागत होती. मात्र आता लागणार नाही. लॉकडाऊन काळात ग्रंथालय, जिमसाठी फी आकारली जात होती. तीही बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच मार्चमध्ये मुदत संपल्यावरही फी आकारली जात होती. त्यावर निर्णय घेण्यासाठी पाच जणांची समिती नेमली आहे. विद्यार्थी आणि पालकांचा विचार घेऊन सुवर्णमध्य काढला जाईल. ३१ मार्चपूर्वी निर्णय होणे अपेक्षित असते, त्यानुसार निर्णय घेतला जाईल.

यावर्षी ज्यांचे प्रवेश झाले आहेत, त्यांची फी परत देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ. मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील.

उदय सामंत म्हणाले, की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट कमी झाला आहे. त्यामुळे नियमावली शिथील करणार आहोत. नवी नियमावली जिल्हाधिकारी जाहीर करतील. रत्नागिरीचा रेट चार दिवसांपासून कमी होतोय. त्यामुळे लवकरच नियमात शिथीलता आणली जाईल. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आतापासून तयारी सुरू झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर कोकणातील लोकांनी सहकार्य करावे अन ते करतील अशी अपेक्षाही सावंत यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.