ETV Bharat / city

Shivsena Symbol dhanushban Hearing : धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी पुढे ढकलली - Hearing on bow symbol adjourned

केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Central Election Commission ) आज होणारी धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी पुढे ढकलून शिवसेनेला ( Shivsena Symbol dhanushban Hearing) आयोगाने वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत ठेवले आहे.

Central Election Commission
Central Election Commission
author img

By

Published : Oct 7, 2022, 3:42 PM IST

मुंबई - अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ( Shiv Sena ) धनुष्यबाण चिन्ह ( Bow and arrow symbol ) कोणाला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज होणारी धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी पुढे ढकलून शिवसेनेला ( Bow and arrow symbol of Shiv Sena ) आयोगाने वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत ठेवले आहे. पोट निवडणूक जवळ आली असताना, आयोगाच्या प्रलंबित निकालामुळे शिवसेनेच्या ( dhanushban Hearing ) चिंतेत भर पडली आहे. तर दुसरीकडे चिन्ह गोठवण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना आमचीच शिंदे गटाचा दावा - शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना आमचीच, असा दावा शिंदे गटाने केला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याची मागणी शिंदे गटाने केली. दरम्यान, ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे एकही कागद सादर केला नाही, असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर केला. तसेच आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधिमंडळ पक्ष सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य असल्याचे म्हटले होते. दरम्यान, शिवसेना पक्षाची कार्यकारिणी व पदाधिकारी हे आपल्यासोबत असल्याचा दावा करत कागदपत्रे जमा करण्यास निवडणूक आयोगाकडे वेळ मागवून घेतला होता.

आजची सुनावणी पुढे ढकलली - निवडणूक आयोगाने 7 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. ही मुदत आज संपली. त्यामुळे आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, निवडणूक आयोगाने आजची सुनावणी पुढे ढकलली आहे. धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले तर नवीन चिन्हावर दोन्ही गटाकडून विचारविनिमय सुरु आहे. आगामी पोट निवडणुकीच्या तोंडावर चिन्हाचा निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.