ETV Bharat / city

Shiv Sainik arrive in Ayodhya : आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शेकडो शिवसैनिक अयोध्येत दाखल, रेल्वे स्थानकावर दिल्या घोषणा

शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्येत ( Aaditya Thackeray visit to Ayodhya today ) राम दर्शनासाठी येणार आहेत. तत्पूर्वी शिवसैनिकही विशेष एक्सप्रेसने मंगळवारी संध्याकाळी ( Shiv Sainiks in Ayodhya news ) आयोध्येत दाखल झाले.

Aditya Thackeray visit to Ayodhya today
शिवसैनिक आयोध्या आगमन
author img

By

Published : Jun 15, 2022, 7:23 AM IST

Updated : Jun 15, 2022, 7:46 AM IST

मुंबई - शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्येत ( Aaditya Thackeray visit to Ayodhya today ) राम दर्शनासाठी येणार आहेत. तत्पूर्वी शिवसैनिकही विशेष एक्सप्रेसने मंगळवारी संध्याकाळी ( Shiv Sainiks in Ayodhya news ) आयोध्येत दाखल झाले.

रेल्वे स्थानकावर जल्लोष करताना शिवसैनिक

हेही वाचा - ED Summons to Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचे समन्स; चौकशीला हजर राहण्याचे निर्देश

शिवसेना नेते आदित्य ठाकरे बुधवारी सकाळी मुंबईहून विमानाने 11 वाजता लखनऊला पोहचणार आहेत. त्यानंतर ते दुपारी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी चार वाजता ते हनुमान गडीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर पाच वाजता अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेतल्यानंतर सहा वाजता लक्ष्मण किल्ल्याला भेट देणार आहेत. संध्याकाळी सात वाजता शरयू तिरावर आरती करणार आहे आणि साडेसात वाजता लखनऊ विमानतळावरून परतीचा प्रवास करणार आहेत.

राज ठाकरेंच्या विरोधानंतर आदित्य ठाकरे अयोध्येत - राज ठाकरे यांना खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केल्यानंतर त्यांनी आपला दौरा स्थगित केला. मात्र, ब्रिजभूषण सिंह यांनी आदित्य ठाकरे यांना विरोध न केल्याने आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. खासदार संजय राऊत यांनी अयोध्येत जाऊन सर्व पाहणी केली आणि खासदार ब्रिजभूषण सिंग यांचीही भेट घेतली.

शिवसैनिकही अयोध्येत दाखल - मुंबईहून विशेष एक्सप्रेसने शिवसैनिक मंगळवारी संध्याकाळी आयोध्या रेल्वे स्थानकावर दाखल झाले. यावेळी शिवसैनिकांनी कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, ही परंपरागत घोषणा देत जोरदार जल्लोष केला. शेकडो शिवसैनिक शिवसेनेच्या घोषणा देत रेल्वेस्थानकावर नाचताना दिसत होते.

हेही वाचा - Threats Salman Khan : सलमान खानला धमकी केवळ बॉलीवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी - गृहमंत्री

Last Updated : Jun 15, 2022, 7:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.