मुंबई खोकेवाल्या गद्दारांनी शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ( Aditya Thackeray on Bow and arrow sign ) दिली आहे.
दोन्ही गटांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळी नावे तसेच चिन्हे वाटप करणार असून, निवडणूक आयोगाच्या अंतिम निर्णयापर्यंत हे काम सुरू राहणार आहे. आगामी पोटनिवडणुकीत दोन्ही गट एकाच पक्षाचे नाव, चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत.
काय आहे निवडणूक आयोगाचा निर्णय निवडणूक आयोगाने ( Election Commission Of Indian ) तात्पुरते शिवसेनेची निशाणी गोठवली ( Shiv sena Party Sign Dhanushyban ) आहे. त्याना शिवसेना ( Shiv sena ) नावही आता वापरता येणार नाही. १० ऑक्टोबर पर्यंत दोन्ही गटाला नवीन चिन्हाचा पर्याय द्यावा लागणार आहे. शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' चिन्हावरून शिंदे - ठाकरे गटात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश पारित केला आहे. आयोगाने सांगितले की, अंधेरी पूर्व जागेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांपैकी एकालाही ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.