ETV Bharat / city

टेलिकॉम उपकरणांना अत्यावश्यक सेवेतील यादीत समाविष्ट करा; मनसेची मागणी

वर्क फ्रॉम होमची परवानगी असल्याने नागरिक घरात राहून काम करत आहेत. यामुळे यासाठी लागणाऱ्या उपकरणाची सेवा देणाऱ्या दुकानांचा समावेश आवश्यक यादीत करावा, अशी मागणी मनसे टेलिकॉम सेनेने राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.

मनसे
मनसे
author img

By

Published : May 2, 2021, 4:38 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारने 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. परंतु मनसेकडून टेलिकॉम सर्विसला अतिआवश्यक सेवेत समावेश करण्याची मागणी राज्य सरकारकडे केेली आहे. वर्क फ्रॉम होमची परवानगी असल्याने नागरिक घरात राहून काम करत आहेत. यामुळे यासाठी लागणाऱ्या उपकरणाची सेवा देणाऱ्या दुकानांचा समावेश आवश्यक यादीत करावा, अशी मागणी मनसे टेलिकॉम सेनेने राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.

मनसेने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, टेलिकॉम सेवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात मानवी जीवनाचा एक दैनंदिन भाग बनला आहे. यामध्ये कार्यालयीन व्यक्‍ती, विद्यार्थी, छोटे व्यवसायिक, गृहनिर्मात्यांसह प्रत्येक जण डिजिटल विश्‍वाकडे आकर्षित झाला आहे. जसे आपण आपल्या हॅण्डसेट किंवा लॅपटॉप / संगणका शिवाय काही तास वेगळे राहू शकत नाही. आज नविन ”कोविड” युगात घरात राहून, घरातूनच काम करण्याचा मार्ग अवलंबला गेला असून आता घरातूनच काम करणे हा जीवनाचा एक भाग बनला आहे. पण ज्यावेळी आपल्याकडे मोबाईल फोन, टॅबलेट, डोंगल, लॅपटॉप ई-मेल यासारख्या संदेशाचे आदान-प्रदान करणारे डिजिटल साधनेच नसतील तर टेलिकॉम नेटवर्क वापरण्याचा काय उपयोग? असा प्रश्न या पत्रात राज्य सरकारला विचारण्यात आला आहे.

टेलिकॉम साधने विक्रेते आपल्या जवळपास असणे आवश्यक आहे. यामध्ये उपकरणे विक्रेते, स्वॉप्टवेअर विक्रेते, स्टॅंड, कर्व्हस, बॅटरी पॅक, हेड फोन्स इत्यादी वस्तूंचा पुरवठा करणारे/विक्रेते आपल्या आवश्यक वस्तूंच्या यादीतील महत्वाचा भाग बनले आहेत. शासनाने वरील बाबींवर लक्ष देत मोबाईल हॅण्डसेट आणि उपकरणे यांना आवश्यक सेवेत समाविष्ट करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.