ETV Bharat / city

VIDEO : अभिनेत्री अनन्या पांडे वडील चंकी पाडेंबरोबर एनसीबी कार्यालयात दाखल - अनन्या पांडे एनसीबी कार्याल

क्रूज ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने पुन्हा कारवाई सुरू केली आहे. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हॉट्सअॅप चाटच्या आधारे एनसीबीने आज अभिनेत्री अनन्या पांडेला चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. मात्र, तब्बल दोन तास उशिराने अनन्या पांडे वडील चंकी पांडे यांच्याबरोबर एनसीबी कार्यालयात आली.

Actress Ananya Pandey reached NCB office
अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल
author img

By

Published : Oct 21, 2021, 5:39 PM IST

Updated : Oct 21, 2021, 5:52 PM IST

मुंबई - क्रूज ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने पुन्हा कारवाई सुरू केली आहे. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हॉट्सअॅप चाटच्या आधारे एनसीबीने आज अभिनेत्री अनन्या पांडेला चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. मात्र, तब्बल दोन तास उशिराने अनन्या पांडे वडील चंकी पांडे यांच्याबरोबर एनसीबी कार्यालयात आली.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - देशातील 100 कोटी कोरोना लसीकरणात राज्याचा मोठा वाटा- राजेश टोपे

एनसीबीकडून अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम

गुरुवारी एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली. अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरूख खानच्या घरी मन्नत पोहोचले. अहवालानुसार, पथकाने अनन्याच्या घरातून काही वस्तू देखील घेतल्या आहेत. त्याचबरोबर, अनन्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनच्या जामिनासाठी २६ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. यानंतर एनसीबी पथक अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. एनसीबीने आर्यन खानसोबत काही नवीन अभिनेत्रींशी गप्पा मारल्याच्या बातम्या आल्या होत्या.

एनसीबीच्या तपासाची व्याप्ती वाढत आहे

बॉलिवूड ड्रग प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तपासाची व्याप्ती वाढत आहे. एनसीबीचे एक पथक गुरुवारी सकाळी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी चौकशीसाठी पोहोचले आणि चार ते पाच तासांच्या चौकशीनंतर निघून गेले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अभिनेता अनन्या पांडेचा फोन घेतला आहे. तिला मुंबई ड्रग्ज प्रकरणाच्या संदर्भात चौकशी एजन्सीने चौकशीसाठी बोलावले आहे.

बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यनचा व्हॉट्स अॅप चॅट

आजच्या सुनावणीपूर्वी या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीच्या हाती आर्यन खानचे काही चॅट्स लागले आहेत. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानसोबत बॉलिवूडची एक नवखी अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. चॅट्समध्ये अभिनेत्रीसोबत आर्यन खानची अंमली पदार्थांबाबत चर्चा झाली होती. कोर्टात सुनावणी दरम्यान एनसीबीने ज्या आरोपींचे चॅट्स सादर केले होते, त्यामध्ये आर्यन खानसह या अभिनेत्रीच्याही चॅट्सचा समावेश आहे.

कधी झाली अटक?

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोवाला जाणाऱ्या क्रुझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर.एम. नेर्लिकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. येथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

आर्यन खान कैदी नंबर - 956

मुंबई ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानची चर्चा सगळीकडे सुरू आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान आणि गौरी खान सध्या आर्यनमुळे चिंतेत आहेत. आर्यनला आर्थर रोड येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्याचा कैदी नंबर एन 956 आहे.

हेही वाचा - 'मन्नत'वर छापा नाही, कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आलो असल्याचे NCB अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

Last Updated : Oct 21, 2021, 5:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.