मुंबई - बॉलिवूड कलाकार विक्रांत मेसी याचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. याबाबत त्याने मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीह बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते.
थेट संदेश पाठवून खाते हॅक-
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार या दोन्ही कलाकांरचे अकाउंट संदेश बॉक्सच्या माध्यमातून हॅक करण्यात आले होते. या दोघांनाही हॅकरने एक लिंक असलेला संदेश पाठवला होता. हॅकर कडून यांना ती लिंक उघडायला सांगून त्यात गोपनीय माहिती (पासवर्ड, युसर आईडी) भरायला सांगितली होती. त्याच अधार हॅकरने या दोघांच्याही सोशल अकाउंटवर ताबा मिळाला मिळवला.
खात्याचे नियंत्रण परत सोपवण्यासाठी पैशाची मागणी-
सध्या इंस्टाग्रामवरून वापरकर्त्यांना त्यांनी केलेल्या पोस्ट कॉपीराइट नियमांचे उल्लंघन करत असल्याचे सांगत वापरकर्त्यांना संभ्रमात टाकून त्यांचे खाते हॅक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा प्रकार जर हॅकर तुमचे खाते हॅक करण्यात यशस्वी झाला तर ते तुमच्या खात्याचे नियंत्रण तुमच्याकडे सोपविण्यासाठी पैशाची मागणी करतात.
सायबर पोलिसांच्या मते अशा प्रकारची फसवणूक करण्यासाठी हॅकर सुरुवातीला एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या समाज माध्यमांवरील खात्याचा शोध घेतात. त्यानंतर कॉपी राईटसारख्या गोष्टीची कारणे देत गोपनीय माहिती मिळवून ते खाते हॅक केले जाते.