ETV Bharat / city

Salman Khan : सलमान खान आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी - सलमान खान आणि वडिलांना जीवे मारण्याची धमकी

सिद्धू मुसेवालाप्रमाणे बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली ( Salman Khan Letter Threatening To Kill ) आहे.

Salman Khan
Salman Khan
author img

By

Published : Jun 5, 2022, 7:34 PM IST

Updated : Jun 5, 2022, 8:50 PM IST

मुंबई - गायक सिद्धू मुसेवाला याची काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता सिद्धू मुसेवालाप्रमाणे बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे एकच खळबळ उडली आहे. सलमान खानचे सलीम खान वडील सकाळी फिरण्यासाठी गेले होते. जेथे ते बाकड्यावर बसले होते, तिथे त्यांना एक पत्र सापडले आहे. त्यामध्ये 'सिद्धू मुसेवालाप्रमाणे तुमची हत्या करण्यात येईल,' असे लिहले आहे. याप्रकरणी आता वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( Salman Khan Letter Threatening To Kill ) आहे.

  • Maharashtra | Actor Salman Khan & his father Salim Khan received a threat letter, today. Bandra Police has filed an FIR against an unknown person & further probe is underway: Mumbai Police

    (File pic) pic.twitter.com/wAKZlgHNH2

    — ANI (@ANI) June 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सलमान खानचे वडील सलीम खान रविवारी ( 5 मे ) वांद्रे बँडस्टँडच्या विहाराजवळ सकाळच्या वेळी फिरायला गेले होते. तेव्हा त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला सलमान खान फिरायला जातो आणि जिथे विश्रांती घेतो, तेथील बाकडावर हे पत्र आढळून आले आहे. तिथे एका बाकड्यावर हे पत्र ठेवण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Salman Khan
वांद्रे पोलिसांनी दाखल केला गुन्हा

काय आहे पत्रात - या पत्रात सलमान खान आणि सलीम खान या दोघांनाही गंभीर धमक्या देण्यात आल्या होत्या. 'मूसा वाला जैसा कर दूंगा,' अशा आशयाचे हे पत्र होते. पोलीस बँडस्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या पत्रामागे कोण आहे? यासाठी पोलीस स्थानिक नागरिकांची चौकशी करत आहेत.

Salman Khan
वांद्रे पोलिसांनी दाखल केला गुन्हा

पोलीस अलर्टवर - या धमकीनंतर मुंबई पोलीसही अलर्ट मोडवर आले आहेत. त्यांनी सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे. तर पोलिसांनी तपासाची सुत्रेही वेगाने फिरवायला सुरूवात केली आहे. आता पोलीस चौकशीत हाती काय लागतंय?, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण, सध्या तरी या धमकीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या पत्रामागील सुत्रधार पकडण्याचे आव्हान आता मुंबई पोलिसांसमोर असणार आहे.

सिद्धू मुसेवालाची हत्या - पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याची काही दिवसापूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सरकारने मुसेवालाची सुरक्षा कमी केल्याच्या एक दिवसानंतर हा हल्ला झाला होता. या घटनेने देश हादरला होता. मात्र, हेच धमकीचं सत्र आता बॉलिवूडपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्येही भितीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - 'तोडेंगे दम मगर साथ ना छोडेंगे', अपघातात तिघा मित्रांचा मृत्यू

Last Updated : Jun 5, 2022, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.