मुंबई - आज अनन्या पांडची एनसीबीने चार तास चौकशी केली. चौकशीनंतर अनन्या वांद्रे येथील घरी पोहचली आहे. सोमवारी पुन्हा अनन्याला चौकशीला बोलावले आहे.
Ananya Panday : अनन्या पांडेची NCB कडून तब्बल साडेतीन तास चौकशी - etv bharat marathi
22:23 October 22
अनन्या पांडे वांद्रे येथील घरी पोहोचली
18:48 October 22
अनन्या पांडेची NCB कडून तब्बल साडेतीन तास चौकशी
मुंबई - अनन्या पांडेची NCB कडून चौकशी संपली आहे. अभिनेत्री अनन्या पांडे NCB कार्यालयाबाहेर पडली आहे. आर्यन खान whats app चॅटसंदर्भात चौकशी झाल्याची माहिती मिळत आहे. तब्बल साडेतीन तास ही चौकशी चालली.
16:20 October 22
एनसीबी कार्यालयाबाहेरून प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
मुंबई - अभिनेत्री अनन्या पांडे हिची एनसीबी कार्यालयात सध्या चौकशी सुरू आहे. कालदेखील अनन्याची चौकशी करण्यात आली होती.
16:07 October 22
whats app चॅटमधील ड्रग्ज पेडलर ताब्यात
मुंबई - आज पुन्हा एनसीबीकडून बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी होत आहे. त्यापूर्वीच एनसीबीने whats app चॅटमध्ये नाव असलेल्या आणखीन एका व्यक्तीवर कारवाई केली आहे. काल रात्री एनसीबीने या व्यक्तीवर कारवाई केली. हा व्यक्ती २४ वर्षीय ड्रग्ज पेडलर असून याप्रकरणातील प्रमुख संशयित असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले आहे.
15:06 October 22
अनन्या पांडे उशिराने एनसीबी कार्यालयात दाखल
मुंबई - आज अनन्या पांडेला पुन्हा सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, अनन्या ही 2 वाजेनंतर चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.
14:31 October 22
अभिनेत्री अनन्या पांडे NCB कार्यालयात दाखल
मुंबई - बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिची काल एनसीबीकडून जवळपास अडीच तास चौकशी करण्यात आली. आज पुन्हा सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, अनन्या ही 2 वाजेनंतर चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाली आहे.
अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यामधील Whats App चॅटचा संदर्भ घेत एनसीबीकडून अनन्याची चौकशी सुरू आहे. काल देखील मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी स्वत: एका महिला अधिकाऱ्यासोबत अनन्याची चौकशी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काल देखील तिला दोन वाजताची वेळ दिली होती. मात्र, तब्बल दोन तास उशिराने अनन्या एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली होती.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी क्रूझवर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा सध्या जेलमध्ये आहे. मात्र, त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे whats app चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या दोघांमधील चॅट एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केले होते.
काल एनसीबी अधिकारी अनन्याच्या घरी धडकले -
आता आर्यनने हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एनसीबी पुन्हा सक्रिय झाली आहे. अनन्या पांडे हिचा जबाब आर्यनला जामीन मिळवण्यासाठी अडचणीचा ठरु शकतो. एनसीबीचे अधिकारी 21 ऑक्टोबर रोजी सकाळी अनन्या पांडे हिच्या घरी पोहचले. त्यांनी तिच्या घराची झडती घेतली. यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांनी अनन्या हिचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतला. यानंतर तिला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावलं.
एनसीबीच्या चौकशीत अनन्याला काय विचारण्यात आलं?
काल समीर वानखेडे यांनी स्वत: अनन्याची चौकशी केली. यावेळी एक महिला अधिकारी देखील होत्या. त्यांनी अनन्याला तिच्या आर्यन सोबतच्या मैत्रीबाबत विचारलं. तसेच तिला ड्रग्स पेडलरबाबत विचारलं. तिच्यात आणि आर्यन यांच्यात झालेले संवाद तिला दाखवण्यात आले. त्या चॅटबाबत तिला विचारण्यात आलं.